आता फास्टॅगची पडणार नाही गरज; कारण, व्हीएनआयटीतील तरुणांनी विकसित केले हे ॲप

मंगेश गोमासे
Tuesday, 15 September 2020

या संकल्पनेतून त्यांनी एक ॲप विकसित केले. या ॲपच्या माध्यमातून सेंट्रल डाटाबेसच्या मदतीने कुठल्याही गाडीच्या नंबर प्लेटवरून ती कुणाच्या मालकीची आहे व इतर सगळी माहिती मोबाईलवर नोटिफिकेशनच्या माध्यमातून देता येणे शक्य होईल.

नागपूर : अपार्टमेंट किंवा एखाद्या मॉलमध्ये येणाऱ्या दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांच्या सुरक्षिततेसाठी विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेतील विद्यार्थ्यांनी एक ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून येथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीतून अपार्टमेंट वा मॉलमध्ये येणाऱ्या गाड्यांची इत्थंभूत माहिती मिळणार आहे.

कुठल्याही अपार्टमेंट व मॉलमध्ये गेल्यावर तेथील गार्ड केवळ येण्या-जाण्याचा टायमिंग आणि नाव नोंदवून घेत असतो. यापलीकडे त्याला काही माहिती नसते. अपार्टमेंटमध्येही राहणारे केव्हा आले केव्हा गेले हे अनेकदा त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती नसते. यातूनच दुचाकी आणि कार चोरीला जाणे इत्यादी घटना घडतात.

क्लिक करा - "नागपूरच्या नावाने कानाला खडा"! माजी आयुक्त तुकाराम मुंढे म्हणतात पुन्हा कधी येणार नाही; वाचा त्यांची खास मुलाखत

या समस्येवर उपाय म्हणून विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेतील इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षात असलेले हिमांशू पाटील, रोहित लाल, कुश अग्रवाल, रिषेश अगरवाल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सच्या तिसऱ्या वर्षात असलेले आर्यन गौर आणि अरुषा किनागे या सहा तरुणांनी एक संकल्पना मांडली.

या संकल्पनेतून त्यांनी एक ॲप विकसित केले. या ॲपच्या माध्यमातून सेंट्रल डाटाबेसच्या मदतीने कुठल्याही गाडीच्या नंबर प्लेटवरून ती कुणाच्या मालकीची आहे व इतर सगळी माहिती मोबाईलवर नोटिफिकेशनच्या माध्यमातून देता येणे शक्य होईल.

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..

त्यामुळे चोरीवर नियंत्रण मिळविता येईल. अगदी चालत्या गाडीची माहिती मिळविता येणे शक्य होईल. शिवाय नेमकी कोणती गाडी आत आली वा बाहेर गेली, याची सगळी माहिती नोटिफिकेशनद्वारे वेळोवेळी मिळेल.

बिझनेस मॉडेल तयार करण्यात येणार

विशेष म्हणजे ती माहिती जतन करून ठेवता येईल. यासाठी विद्यार्थ्यांनी मशीन लर्निंग, वेबसाइट, कॉम्पुटर व्हीजन, अँड्रॉईड ॲपचा उपयोग केला आहे. विशेष म्हणजे तीन ऑगस्ट रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे झालेल्या हॅकेथॉनमध्ये या संकल्पनेला एक लाखाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. आता या संकल्पनेचा बिझनेस मॉडेल तयार करण्यात येणार आहे.

महत्त्वाची बातमी - अत्यंत दुर्दैवी! रिमझिम पावसात खेळण्याचा तिला आवरला नाही मोह आणि घडली हृदयद्रावक घटना

फास्टॅगचीही गरज नाही

टोल नाक्यावर पैसे देण्यासाठी थांबावे लागते. मात्र, या ॲपला पेटीएम व इतर युपीआय अकाउंट लिंक केल्यास कार सीसीटीव्हीच्या परिघात आल्यास आपोआप अकाऊंटमधून तेवढे पैसे कपात होतील. त्यामुळे यापुढे फास्टॅगचीही गरज पडणार नाही.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: App developed by the youth of VNIT