Success Story : अभियांत्रिकीचा विद्यार्थी 'स्क्रॅप'ची लावतोय योग्य विल्हेवाट, साकारतो आकर्षक वस्तू

arun warma created durable things from scrap in nagpur
arun warma created durable things from scrap in nagpur

नागपूर : कचरा आणि स्क्रॅप महानगरांसाठी अभिशाप ठरला आहे. त्यात आता ई-कचऱ्याची भर पडली आहे. त्याची विल्हेवाट लावणे हा गंभीर प्रश्न सर्व जगासमोर उभा ठाकला असून त्यावर उपाय शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. संत्रानगरीतील तरुणाने 'स्क्रॅप'चा प्रश्न मार्गी लावता येईल, असा उपाय शोधला आहे. या 'स्क्रॅप'चा वापर करुन तो कल्पकतेने आकर्षक वस्तूंची निर्मिती करतो. विशेष म्हणजे 'थ्रीडीप्रिंट कास्टिंग'चा वापर करुन शोभेच्या वस्तू साकारतो.

अरुण कपिल वर्मा, असे या तरुणाचे नाव असून तो जे. डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचा विद्यार्थी आहे. महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरींगचा अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना मनात कास्टींगच्या क्षेत्रात काहीतरी करायची इच्छा त्याच्या मनात होती. यातूनच त्याने 'स्क्रॅप'मधून कास्टींगचा व्यवसाय करण्याचे ठरविले. त्याने अभ्यासक्रम पूर्ण करताच व्यवसाय सुरू करण्याचा विचार मनात आला. त्यासाठी महाविद्यालयातील आंत्राप्रिनर डेव्हलपमेंट सेलच्या प्राध्यापकांनी मदत केली. तसेच अरुणचे गुरू डॉ. मुर्तूजा अली यांनी त्याला भरपूर मदत केली. ती प्रेरणा पाठीशी घेऊन त्याने प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. मात्र, यासाठी मोठा प्रकल्प उभारताना येणारा खर्चही अधिक होता. त्यामुळे त्याने 'स्क्रॅप मेल्ट' करणाऱ्या जुन्या आणि छोट्या यंत्राचा उपयोग करुन कामास सुरुवात केली. मात्र, सहज कुठलीच गोष्ट मिळत नसल्याने अरुणने विविध छोट्या ते मोठ्या दुकानदार आणि व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांच्याकडून `स्क्रॅप' मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये त्याला बऱ्याच अडचणी आल्यात. अखेर स्क्रॅप खरेदी करण्यात त्याला यश आले. यानंतर कमी किमतीत दूचाकी, चारचाकी वाहनाचे स्क्रॅप आणि बिल्डींगच्या कामातून मिळणारे स्क्रॅप जमा करीत, त्याला 'हायप्रोफाईल टेम्प्रेचर'वर 'मेल्ट' करीत त्यातून घर सजावटीसाठी विविध आकर्षक वस्तूंची निर्मिती करण्यास सुरुवात केली. प्रत्येकवेळी नवनविन आणि आकर्षक डिझाईनचा वापर करुन ग्राहकांची पसंती मिळविली. त्याने हळू-हळू तयार केलेल्या वस्तूंना मागणी वाढू लागली. त्यातूनच केवळ नागपूरच नव्हे तर रायपूर, भिलाई, भंडारा, गोंदिया, परतवाडा येथेही अरुणने तयार केलेले उत्पादन पाठविण्यास सुरुवात केली. आज त्याने व्यवसायात चांगलाच जम बसविला आहे.  

महाविद्यालयातून मिळाले सहकार्य -
अरुणने महाविद्यालयात प्रकल्पाबाबत माहिती दिली असता, संस्थेचे अध्यक्ष संजय अग्रवाल यांनी अरुण या उद्योगाला उभारी देण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरविले. याशिवाच आंत्राप्रिनर डेव्हलपमेंट सेलने त्याच्या संकल्पनेला मूर्त रुप देण्यासाठी सहकार्य केले. 

कही व्यवसाय सुरू करताना कुठली ना कुठली प्रेरणा आपल्या मागे असणे गरजेचे आहे. ती प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाल्यानेच आज स्वतःचे स्टार्टअप सुरू करता आले. 
-अरुण वर्मा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com