नागपुरात अन्नक्षेत्र फाउंडेशनची चांगुलपणाची चळवळ, फेसुबकच्या माध्यमातून दिग्गजांसोबत संवाद

aruna purohit foundation organizing celebrities talks for people through facebook
aruna purohit foundation organizing celebrities talks for people through facebook

नागपूर : लॉकडाऊन तसेच कोरोनामुळे मानवाच्या वागण्यावर आलेल्या मर्यादांमुळे अनेकजण हतबल झाले आहेत. ज्येष्ठांना तर घरी बसून काय करावे हेच सुचेनासे झाले आहे. त्यांना बौद्धिक खाद्य पुरवण्यासाठी भारताचे निवृत्त परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे आणि नागपूरकर उद्योजिका अरुणा पुरोहित यांच्या अन्नक्षेत्र फाउंडेशनने चांगुलपणाची चळवळ सुरू केली आहे. दररोज फेसबुकच्या माध्यमातून एक तास विविध मान्यवरांसोबत जनसामान्यांचा संवाद घडवला जात आहे. 

सप्टेंबर महिन्यात १३५ मान्यवरांशी संवाद घडवून आणला. १५ ऑक्टोबरपर्यंत या उपक्रमाचे दीडशे भाग होतील. हा उपक्रम असाच पुढे नेऊन ३६५ दिवस सातत्याने चालवण्याचा अरुणा पुरोहित आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा निर्धार आहे. या उपक्रमाची सुरुवात डॉ. मुळे यांच्या उद्बोधनाने झाली. पहिल्या दिवशी डॉ. मुळे यांनी देशाच्या संविधानाबाबत माहिती देत नागरिकांच्या शंका दूर केल्या. त्यानंतर नितीन गडकरी, रामदास आठवले, सुधीर मुनगंटीवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार असे राजकारणी जुळले. लक्ष्मीकांत देशमुख, विश्‍वास पाटील साहित्यिक, मंदार फणसे , दिलीप चव्हाण, अजित द्विवेदी (पत्रकार), शमसुद्दीन तांबोळी (मुस्लिम सुधारक), सुबोध भावे (अभिनेता), अभिजित देशमुख (क्रिकेटपंच), हनुमंतराव गायकवाड (उद्योगपती), भूषण कोवळेकर (बँकर), सुमंत टेकाडे (इतिहासकार), विश्‍वंभर चौधरी (सामाजिक कार्यकर्ते), ज्योतिका कालरा (मानवाधिकार कार्यकर्त्या) आनंद पाटील (ज्येष्ठ सनदी अधिकारी), सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री), विष्णू मनोहर (मास्टर शेफ) अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा संवाद या चांगुलपणाच्या चळवळीत त्यांनी घडवून आणला. 

पुढील काही दिवसात भारतीय लष्करातील विक्रांत मोरे, नृत्यांगना आश्‍विनी काळसेकर, राजकीय क्षेत्रातील देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, युवक चळवळीतील क्रांती शहा, जेरील बानाईत, मिलिंद थत्ते, बँकिंग क्षेत्रातील किशोर खरात अशा अनेक मान्यवरांना त्या या माध्यमातून बोलते करणार आहेत. हा कार्यक्रम दररोज सायंकाळी पाच वाजता सुरू होतो. या उपक्रमात http://www.facebook.com/urjawelfarefoundation/live या फेसबुक पेजवर जाऊन सहभागी होता येते. मूळ संकल्पना अरुणा पुरोहित यांची असली तरी त्याला मूर्त रूप देण्यासाठी डॉ. ज्ञानेश्वर मुळे, ऊर्जा फाउंडेशनचे यशवंत शितोळे यांनीही सिंहाचा वाटा उचलला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com