सिगरेट खरचं आरोग्यासाठी हानिकारक; सिगरेटच्या पैशावरून वाद झाल्याने कुख्यात भैरववर प्राणघातक हल्ला

अनिल कांबळे
Tuesday, 17 November 2020

नातेवाईक आणि मित्र भैरवला धडा शिकविण्यासाठी त्याच्या घरी गेले. भैरवला घरातून बाहेर काढत जबर मारहाण केली. लोखंडी रॉड आणि रस्त्यावर पडलेला फरशीचा तुकडा उचलून त्याच्या डोक्यावर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. भैरवला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी पसार झाले.

नागपूर : लकडगंज ठाण्याअंतर्गत जुनी मंगळवारी परिसरात पाच युवकांनी एकाला केवल सिगरेटच्या पैशावरून वाद घालत घरातून बाहेर काढत मारहाण केली. लोखंडी रॉड आणि फरशीच्या तुकड्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. विजय ऊर्फ भैरव दिलीप डायरे (३५, रा. छोटा ढिवरपुरा, जुनी मंगळवारी) असे जखमीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये देवेंद्र उर्फ पिंटू नारायण पाटील (३४), राजेश लक्ष्मणराव निमजे (३५), राजेंद्र उर्फ राजेश रमेश निर्वाण (३४), राजेश रामकृष्ण वाघाडे (२८) आणि मनोज देवराव निमजे (४०) यांचा समावेश आहे. भैरव डायरे हा जुना गुन्हेगार आहे. त्याच्यावर १० वर्षांपूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षाही भोगली आहे.

क्लिक करा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

पिंटूचा जुनी मंगळवारी परिसरातच पानठेला आहे. भैरव नेहमी त्याच्या पानठेल्यावर सिगरेट पिण्यासाठी जात होता. पैसे मागितल्यावर दादागिरी करीत होता. रविवारी सायंकाळीही भैरव त्याच्या पानठेल्यावर सिगरेट पिण्यासाठी आला. पैसे मागितले असता शिवीगाळ करू लागला. ठार मारण्याची धमकीही दिली. पिंटू दुकान बंद करून आपल्या घरी गेला. कुटुंबीयांना भैरवच्या दादागिरीबाबत सांगितले.

नातेवाईक आणि मित्र भैरवला धडा शिकविण्यासाठी त्याच्या घरी गेले. भैरवला घरातून बाहेर काढत जबर मारहाण केली. लोखंडी रॉड आणि रस्त्यावर पडलेला फरशीचा तुकडा उचलून त्याच्या डोक्यावर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. भैरवला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी पसार झाले.

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पो. नि. पराग पोटे पथकासह घटनास्थळावर पोहोचले. भैरवला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी पाचही आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assault over a dispute over cigarette money