esakal | भयंकर... वीस वर्षीय अपंग युवतीचा साठ वर्षीय वृद्धानी केला बलात्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Atrocities on Khaparkheda disabled girl in Nagpur district

झाकीर फरार झाल्यानंतर खापरखेडा पोलिसांनी पथक तयार करून शोध सुरू केला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर साकोली येथून झाकीरला मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली. घटनेची नोंद खापरखेडा पोलिसांनी केली असून, ठाणेदार चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनात एपीआय धुमाळ मॅडम पुढील तपास करीत आहे. 

भयंकर... वीस वर्षीय अपंग युवतीचा साठ वर्षीय वृद्धानी केला बलात्कार

sakal_logo
By
दिलीप गजभिये

खापरखेडा (जि. नागपूर) : तरुणी वीस वर्षांची... शरीराने अपंग... चालताही येत नाही... बोलताही येत नाही... नुसती एकसारखी पाहत राहते... चोवीस तास खाटावर राहते... ती लहान असतानाच आई सोडून गेली... वडिलांना चार महिन्यांपूर्वी लकव्याने ग्रासले... एका खोलीत झोपून असतात... घरची परिस्थितीही हलाखीची... अशात एका वुद्धाची नजर अपंग मुलीवर पडली आणि... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खापरखेडा पोलिस ठाण्याअंतर्गत अपंग युवती आपल्या कुटुंबासह राहते. तिच्या घराशेजारीच झाकीर हुसैन दुधकनोजे (वय 60) हा राहतो. झाकीर हा खासगी वाहनावर चालक आहे. त्याची वाईट नजर अपंग मुलीवर होती. तो नेहमी तिच्या जवळ जाण्याची संधी शोधत होता.

हेही वाचा - पत्नीच्या जिद्दीसमोर हरला पती; मनावर दगड ठेऊन इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले, मात्र...

युवतीच्या वडिलांना लकवा लागल्याने ते एका खोलीत झोपून राहतात. हीच संधी साधून रविवारी सायंकाळच्या सुमारास झाकीरने युवतीच्या घरात प्रवेश केला आणि बलात्कार केला. युवती अपंग असल्यामुळे वाच्यता करू शकली नाही. तसेच आरडाओरड करू न शकल्याने कुणालाही अंदर अत्याचार सुरू असल्याचे समजले नाही. तसेच घरात असलेले वडीलही लकवाग्रस्त असल्याने मदतीसाठी धाऊ शकले नाही. 

दरम्यान, घरासमोर काही युवक खेळत होते. काही वेळांनी भाऊ व युवक घरात गेले असता नराधम झाकीर हा निर्वस्त्र आढळून आला. यामुळे युवतीवर अतिप्रसंग झाल्याचे समजले. अपंग युवतीवर अतिप्रसंग झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. पीडितीच्या नातेवाईकांनी पुढाकार घेऊन सोमवारी रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, तक्रार दाखल केल्याची माहिती कळताच झाकीर गावातून पसार झाला होता.

सविस्तर वाचा - ती रडत रडत म्हणाली, 'तू पण तर मुलगी आहे, प्लीज माझा अश्‍लील व्हिडिओ नको काढू...'

झाकीर फरार झाल्यानंतर खापरखेडा पोलिसांनी पथक तयार करून शोध सुरू केला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर साकोली येथून झाकीरला मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली. घटनेची नोंद खापरखेडा पोलिसांनी केली असून, ठाणेदार चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनात एपीआय धुमाळ मॅडम पुढील तपास करीत आहे. 

पीडितेच्या भावाला मिळाली धमकी!

आपल्या बहिणीवर बलात्कार झाल्याचे समजताच भाऊ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेला. मात्र, रविवारी रात्री पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही. तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता झाकीरला पोलिस ठाण्यात आणले होते. मात्र, पीडितेच्या भावाला कुणीतरी धमकी देत असल्याने त्याने घाबरून तक्रार दिली नाही, अशी चर्चा गावात होती. त्यामुळे झाकीरला पोलिसांनी चोप देऊन सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अधिक माहितीसाठी - Video : फार्महाऊसवर सहा जणांनी पतीसमोर केला पत्नीवर बलात्कार

पीडितेच्या आईचा अतापता नाही 

पीडित युवतीला तीन भाऊ आहे. तिघांचेही लग्न व्हायचे आहे. वडिलांना चार महिन्यांपूर्वी लकवा लागला होता. त्यामुळे ते खाडावरच पडून असतात. पीडित लहान असतानाच तिची आई सोडून गेली. ती जिवंत आहे की मेली हेही माहित नाही. त्यामुळे त्यांना लहान पनापासूनच त्रास सहन करावा लागत होता. 

आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी

झाकीरने ओळखीचा फायदा घेत अपंग युवतीवर अत्याचार केला. कुणालाही काहीही समजणार नाही अशाप्रकारे त्याने घरात प्रवेश करीत कृत्य केले. पीडितेचे भाऊ व काही युवक घरात गेले असता हा प्रकार पुढील आला. आरोपीला पोलिसांनी साकोली येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.