ईडीचा धाक, पैशाचे आमिष दाखवून महाराष्ट्राचेही सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न

राजेश चरपे
मंगळवार, 14 जुलै 2020

लॉकडाउनमुळे बेरोजगारी वाढली आहे, आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशा संकटाच्या काळात कोट्यवधींचे आमिष दाखवून केंद्र सरकारने फोडाफाडीचे प्रयत्न सुरू केले आहे. 

नागपूर : कर्नाटक आणि मध्य प्रदेश भाजपच्या मनसुब्यांना यश आले आहे. आता राजस्थानची सत्ता हलवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोबत महाराष्ट्रातही सत्ता हलविण्याचा हालचाली सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी खंबीर आहे. भाजपचे सर्व मनसुबे उद्‌ध्वस्त होणार असल्याचा दावा डॉ. नितीन राऊत यांनी केला.

वा रे पठ्ठे...शाळेलाच पाठवले ऑनलाइन क्लासेसचे बिल

राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे सरकार जनतेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्थापन झाले आहे. गरीब जनतेला न्याय मिळू लागला आहे. त्यामुळे भाजपच्या प्रयत्नांना इतक्‍या सहज यश मिळेल असे वाटत नाही. संपूण देश कोरोना महामारीशी लढत आहे. लॉकडाउनमुळे बेरोजगारी वाढली आहे, आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशा संकटाच्या काळात कोट्यवधींचे आमिष दाखवून केंद्र सरकारचे फोडाफाडीचे प्रयत्न सुरू आहे. 

कर्नाटकमध्ये सुमारे शंभर कोटी रुपये देऊन आमदार खरेदी केले गेले. शेवटी पैसा सर्वांनाच प्रिय आहे. त्यामुळे त्यांचे फावते आहे. जे पैसे देऊन मानत नाहीत, त्यांना ईडीच्या कारवाईचा धाक दाखवला जातो. राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी गुजरातमध्ये 25-25 कोटी रुपयांना आमदार विकत घेण्याचे काम भाजपने केले.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

त्यापूर्वी मध्य प्रदेशचे सरकार पाडताना पैशाचाच वापर केला. तोच प्रयोग राजस्थानमध्ये केला जात आहे. लोकशाहीमध्ये पैशांचा, बळाचा वापर करून त्यांना नामोहरम केले जात आहे. हे देशाच्या लोकशाहीला घातक आहे आणि संविधानालाही छेद देणारे असल्याचे डॉ. राऊत म्हणाले. 

मध्य प्रदेश, राजस्थान सोबतच मोदी सरकार महाराष्ट्राचीही सत्ताही ईडीचा धाक आणि पैशाचे आमिष दाखवून अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला.

(संपादन : प्रशांत राॅय)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to destabilize the Maharashtra government