३२ विद्यार्थ्यांच्या विषबाधेमागे भाजप नगरसेविका असल्याचा संशय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

नागपूर : शालेय पोषण आहारातून 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या प्रकरणात पोषण आहाराचे वाटप करणाऱ्या शगुण महिला बचतगटाला पोषण आहाराचे वाटप करण्यास शनिवारपासून थांबविण्याचा निर्णय मनपाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला. विशेष म्हणजे याच शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांनी निकष पाळले नसताना कंत्राट देण्याचा निर्णय घेतला होता.

नागपूर : शालेय पोषण आहारातून 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या प्रकरणात पोषण आहाराचे वाटप करणाऱ्या शगुण महिला बचतगटाला पोषण आहाराचे वाटप करण्यास शनिवारपासून थांबविण्याचा निर्णय मनपाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला. विशेष म्हणजे याच शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांनी निकष पाळले नसताना कंत्राट देण्याचा निर्णय घेतला होता.

मारोतराव मुडे हायस्कूलमध्ये शुक्रवारी (ता. 7) दुपारच्या सुमारास 32 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाली होती. यात पाच ते आठ या वर्गातील 12 मुली आणि 20 मुलांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना पोटात दुखणे, डोके दुखणे आणि मळमळणे आदी त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते.

शगुण महिला बचतगटाचा पुरवठा थांबविला
शगुण महिला बचतगटामार्फत शाळेत पोषण आहार वितरित करण्यात आला होता. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. शुक्रवारी घटना घडताच अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आहाराचे नमुने तपासणीसाठी नेले होते. या नमुन्याचा अहवाल उद्या येणार आहे. मात्र, एफडीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, नमुन्यांमध्ये पोषण आहाराचा दर्जा खालावलेला असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे बचतगटावर कारवाई निश्‍चित करण्यात येणार होती. यापूर्वीच महानगरपालिकेने त्यांच्या पोषण आहार वितरणाचे काम थांबवून अक्षयपात्र फाउंडेशनला पोषण आहार वितरित करण्याचे आदेश दिले आहेत.

अभिनेत्री रविना टंडन, फराह खान जोरजोरात हसल्या अन्‌ गुन्हा दाखल

एफडीएच्या अहवालात आहारावर ताशेरे
शनिवारी (ता. आठ) आरटीई ऍक्‍शन समितीचे शाहिद शरीफ यांनी हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात शगुण महिला बचतगट आणि मुख्याध्यापकाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी एफडीआयच्या अहवालानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट केले. 

12 मुलांना सुटी 
मेडिकलमध्ये दाखल करण्यात आलेल्या 32 मुलांपैकी 12 मुलांना डॉक्‍टरांनी सुटी देण्यात आली. आता मेडिकलमध्ये बारा वर्षांखालील मुलांना देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, त्यांना उद्या सुटी देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मुरारी सिंग यांनी दिली. 

भाऊ समजून बांधत होती राखी नंतर केले बंद, मग सुरू झाला त्रास...

बचतगट, नगरसेविकेचा पत्ता एकसारखा 
महापालिकेकडून शगुण महिला बचतगटाच्या वितरणाला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, ज्या बचतगटाद्वारे वितरित केलेल्या पोषण आहारामुळे 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली, त्या बचतगटाचा "10, ईस्ट हायकोर्ट रोड' हा पत्ता रामदासपेठ येथील नगरसेविकेच्या घरचा पत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे "सकाळ'ने प्रकाशित केलेल्या "पोषण आहार भाजप पदाधिकाऱ्यांच्या घशात' या बातमीला दुजोरा मिळाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp corporator behind student food poison case nagpur