राज्य सरकारच्या विरोधात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दाखल करणार ४२० चा गुन्हा - सुधीर मुनगंटीवार

bjp leader sudhir mungantiwar criticized mahavikas aghadi government on tribal issue
bjp leader sudhir mungantiwar criticized mahavikas aghadi government on tribal issue

नागपूर - 2018 च्या जनगणनेनुसार 10 टक्के जनता आदिवासींची आहे,  एक कोटी दोन लक्ष आदिवासींची संख्या आहे. आदिवासींना खावटी देऊ, असे राज्य सरकारने सांगितले होते. मात्र, चार महिने झाले खावटी दिली नाही. ही आदिवासी जनतेची थट्टा आहे. खावटीसाठी भरावा लागणारा अर्ज म्हणजे खावटी एक दिवा स्वप्न वाटते आहे. त्यामुळं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सरकारच्या विरोधात  420 चा गुन्हा दाखल करणार. पोलिस गुन्हा दाखल करणार नसतील तर न्यायालयात जाऊ, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. आज नागपुरात ते माध्यमांशी बोलत होते.
 

नानांनी 'ना...ना...' केल्यामुळेच हिवाळी अधिवेशन नागपूरला झाले नाही - 

हिवाळी अधिवेशनासाठी संपूर्ण मंत्रालय नागपूरला स्थानांतरित करावे लागते. हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढणार असल्याने मुंबईसह नागपूरच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. काही लोकप्रतिनिधींनी याला विरोध दर्शविला आहे. अधिवेशन नागपूरला होणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आल्याने ते रद्द करणे अवघड ठरत होते. परंतु, मुंबई पातळीवर अधिवेशन नागपूरला न घेण्याबाबत आधीच जवळपास निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे कोरोनाचा वाढता धोका, अधिकाऱ्यांचा विरोध लक्षात घेता हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचे ठरवले आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. मात्र, आता यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला आहे. नाना पटोले यांनीच अधिवेशन नागपुरात घ्यायला नकार दिल्याचा आरोप मुनगंटीवारांनी केली. 

कोण आहे तो विदर्भ विरोधी, असा प्रश्न आम्ही विधानसभेत सरकारला विचारू. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले विदर्भाचे असल्याने हिवाळी अधिवेशन नागपुरला होईल, असे वाटत होते. परंतु नानांनीच ना...ना... केले. कोरोना नागपूरला होतो आणि मुंबईला होणार नाही, असा जावईशोध कुणी लावला, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

संपादन - भाग्यश्री राऊत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com