राज्य तर गेलेच, आता नागपूर जि. प. मध्येही पराभव : भाजपचा बालेकिल्ला ढासळला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 January 2020

गेले पाच वर्षे नागपूर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. यानंतर सुमारे अडीच वर्षे मुदतवाढ मिळाल्याने तब्बल साडेसात वर्षे भाजपने नागपूर जिल्हा परिषदेवर राज्य केले. मात्र आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत येणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. जल्हा परिषदेच्या निवडणूक निकालात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीने मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांत बहुतांश ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.

नागपूर : नागपूर जिल्हा एकेकाळी भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होता. गत विधानसभेत एकूण 12 पैकी 11 जागांवर भाजपने विजय मिळविला होता. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपला जिल्हा परिषद निवडणुकीत देखील पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. जिल्हा परिषद निवडणूक निकालात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने भाजपची धूळधाण करीत एकहाती सत्ता मिळविली आहे. या निकालामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जोरदार धक्का बसला आहे. या विजयामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधे उत्साह संचारला आहे.

गेले पाच वर्षे नागपूर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. यानंतर सुमारे अडीच वर्षे मुदतवाढ मिळाल्याने तब्बल साडेसात वर्षे भाजपने नागपूर जिल्हा परिषदेवर राज्य केले. मात्र आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत येणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. जल्हा परिषदेच्या निवडणूक निकालात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीने मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांत बहुतांश ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, उमरेड या तालुक्‍यांत आघाडीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे.

महत्त्वाची बातमी - नागपूर जि. प.वर कॉंग्रेस-राकॉं आघाडीचा झेंडा? भाजपला झटका
 

कॉंग्रेस-राकॉं आघाडीचा झेंडा
अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी मेंटपांजरा सर्कलमधून विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे प्रवीण आडकीने यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश बंग यांचे पुत्र दिनेश यांनी रायपूर जिल्हा परिषद सर्कलमधून विजय मिळवला आहे. त्यांनी कॉंग्रेसचे बाबा आष्टणकर यांचा पराभव केला. कॉंग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे हे केळवदमधून विजयी झाले. कॉंग्रेसचे नाना कंभाले यांनी कोराडीमधून विजय मिळविला. माजी मंत्री चंदशेखर बावनकुळे हे कोराडीचे रहिवाशी आहेत, हे विशेष.

हेही वाचा - बावनकुळे म्हणतात, वडेट्टीवारांचे भाजपमध्ये स्वागतच आहे

शिवसेनेला मोठा धक्का
भाजपच्या बबिता गजबे नरखेड तालुक्‍यातील बेलोना सर्कलमधून अटीतटीच्या लढतीत विजयी झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी धक्का मानला जात आहे. भाजपने पाच जागांवर विजय मिळविला आहे. या निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

सर्कलनिहाय निकाल

- कवठा पंचायत समितीमधून कॉंग्रेसच्या दिशा चनकापुरे व कोराडी पंचायत समितीमधून कॉंग्रेसच्या अर्चना सुरेश बोंडे विजयी
- येनवा : समीर उमप (शेकाप) विजयी
- कॉंग्रेसचे योगेश देशमुख अरोली-कोदामेंडीमधून विजयी
- गोधनी सर्कलमध्ये कॉंग्रेसच्या जोती राऊत विजयी, पंचायत समिती मध्येही कॉंग्रेस विजयी
- बेलोना : राष्ट्रवादीच्या दीक्षा मुलताईकी विजयी
- येनवा : अनुराधा खराडे विजयी
- बडेगाव जि.प.गट व पंचायत समिती गणात कॉंग्रेस विजयी
- धापेवाडा येथून महेंद्र डोंगरे विजयी
- पारडसिंगा जिल्हा परिषद सर्कलमधून राष्ट्रवादी चंद्रशेखर कोल्हे विजयी
- लाडगावमधून राष्ट्रवादीच्या निलिमा ठाकरे विजयी
- रायपूर जिल्हा परिषद सर्कलमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिनेश बंग विजयी
- माहुलीमधून राजू कुसुबे विजयी, तर कॉंग्रेसचे चेतन देशमुख माहुली पं. स. मधून व चारगाव पं. स.मधून शिवसेनेचे धनरे विजयी
- मकरधोकडा जिल्हा परिषद सर्कलमधून कॉंग्रेसच्या सुनीता ठाकरे विजयी
- बडेगावमधून कॉंग्रेसच्या छाया बनसिंगे विजयी, भाजपच्या क्रांती देशमुख यांचा पराभव
- रामटेक-बोथिया-पालोरा जि.प.मधून कॉंग्रेसचे कैलास राऊत विजयी
- येरखेडा सर्कलमधून भाजपचे मोहन माकडे विजयी.
- तेलकामठी सर्कल : पिंकी कौरती (कॉंग्रेस) विजयी
- तेलकामठी पंचायत समिती : मालती वसू (कॉंग्रेस), श्रावनदादा भिंगारे(कॉंग्रेस) विजयी
- चाचेर निमखेडामधून कैलास बरबटे (भाजपा) विजयी, शिवसेनेचे देवेंद्र गोडबोले पराभूत
- देवलापार सर्कलमधून कॉंग्रेसच्या कैलास राऊत विजयी
- केळवद गटातून कॉंग्रेसचे मनोहर कुंभारे विजयी
- मकरधोकडा पंचायत समितीमधून कॉंग्रेसच्या शालू धनराज गिल्लूरकर विजयी
- वायगाव जिल्हा परिषद : कॉंग्रेसच्या माधुरी अमोल गेडाम विजयी
- करभाड पं.स : कॉंग्रेसचे संदीप भलावी विजयी, भाजप दुसऱ्या क्रमाकावर
- सावनेर तालुक्‍यातील 6 पैकी 4 जागांचे निकाल जाहीर, चारही जागा कॉंग्रेसकडे
- नरखेड तालुक्‍यातील बेलोना सर्कलमधून भाजपच्या बबिता प्रफुल्ल गजबे विजयी
- बेलोना पंचायत समिती सर्कलमधून राकॉंच्या रश्‍मी आरघोडे व खरसोली पंचायत समितीमधून राकॉंचे महेंद्र गजबे विजयी
- आमदार टेकचंद सावरकर यांच्या सर्कलमध्ये कॉंगेसचे तापेश्वर वैद्य व दोन्ही पंचायत समिती गणातून कॉंग्रेस विजयी
- हिंगणा तालुक्‍यातील डिग्डोहमधून सुचिता ठाकरे (राष्ट्रवादी), रायपूर दिनेश बंग (राष्ट्रवादी), निलडोह राजू हरडे (भाजप) विजयी.
- वाकोडीमधून जि.प. व वाकोडी, वाघोडा प.स.मधून कॉंग्रेस विजयी.
- मकरधोकडा सर्कलमधून सुनीता ठाकरे विजयी, प .स मधून कॉंग्रेसच्या गिल्लूरकर विजयी
- पाचगाव प. स. मधून कॉंग्रेसच्या प्रियंका लोखंडे विजयी
- नांद जि. प. नेमावली माटे (कॉंग्रेस) विजयी
- नांद पंचायत समितीमधून नंदा नारनवरे (अपक्ष) विजयी
- बेलामधून वंदना अरुण बालपांडे अपक्ष उमेदवार मतांनी विजयी
- गोंधनी (रेल्वे) जि. प. : ज्योती राऊत (कॉंग्रेस) विजयी
- बोखारा पं. स. : अर्पणा राऊत (कॉंग्रेस) विजयी
- गोधनी (रेल्वे) पं.स : रुपाली मनोहर (कॉंग्रेस) विजयी
- दवलामेटी जि. प. : ममता धोपटे (कॉंग्रेस) विजयी
- लाव्हा पं. स. : प्रीती अखंड (कॉंग्रेस) विजयी
- दवलामेटी पं. स. : सुधीर करंजेकर (वंचित) विजयी
- सोनेगांव (निपाणी) जि. प. : भारती पाटील (कॉंग्रेस) विजयी
- सोनेगांव पं. स. : रेखा वरठी (कॉंग्रेस)
- बाजारगाव पं. स. : अविनाश पारधी (कॉंग्रेस) विजयी
क्लिक करा - सात वेळा झाला शरीराचा सौदा, जिवंतपणीच भोगाव्या लागल्या नरकयातना
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp lost nagpur z p also big defeate of gadkari and fadanvis