रस्त्याच्या बांधकामात काळेबेरे; परवानगी नसताना का वापरले "ते' साहित्य...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

सध्या तालुक्‍यात अंबाडा (सा.) ते बरडपवनी या रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गात एक नाला असल्यामुळे त्यावर 40 लाख रुपये किमतीच्या पुलाचे काम सुरू आहे. या कामात सर्रास काळी रेती वापरली जात आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू आहे.

जलालखेडा (जि.नागपूर): नरखेड तालुक्‍यातील अंबाडा (सायवाडा) ते बरडपवनी या मार्गाची बऱ्यांच वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी होती. यामुळे या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या या मार्गावरील एका नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. पण, या बांधकामावर शासनाची परवानगी नसलेल्या काळ्या वाळूचा वापर करण्यात येत असल्यामुळे ही वाळूची तस्करी नाही का, असा ग्रामपंचायत सदस्य यांनी आरोप केला.

हेही वाचा: मॉन्सूनची वाटचाल योग्य दिशेने, या तारखेला होणार विदर्भात दाखल

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
नरखेड तालुक्‍यात काळ्या वाळूचा लिलाव न झाल्यामुळे ही वाळू वापरण्यास बंदी आहे. विशेष म्हणजे शासकीय कामात तर अशी वाळूचा वापरच करता येत नाही. जी वाळू विकण्याचा परवानाच नाही ती वाळू वापरण्यास शासनाने बंदी घातली आहे. यामुळेच नरखेड तालुक्‍यात पांढरी वाळू आणणे लांब पडत असल्यावरदेखील तीच वाळू वापरण्याची शासनाची मान्यता आहे, त्यासाठी शासन निधी देते. पण, अनेक एजन्सी पांढरी वाळू महाग पडत असल्यामुळे पैसे तर शासनाकडून पांढऱ्या वाळूचे घेऊन शासकीय कामात परवाना नसल्याचा सर्रास वापर करीत आहे.

आणखी वाचा: या देशातील कोणतीही वस्तू खरेदी करू नका : कॅटचे बहिष्काराचे आवाहन

वापर करणे गुन्हा आहे !
सध्या तालुक्‍यात अंबाडा (सा.) ते बरडपवनी या रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गात एक नाला असल्यामुळे त्यावर 40 लाख रुपये किमतीच्या पुलाचे काम सुरू आहे. या कामात सर्रास काळी रेती वापरली जात आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू आहे. विशेष म्हणजे काळ्या वाळूची उचल करणे गुन्हा असूनदेखील शासकीय कामात काळ्या वाळूचा कसा वापर करण्यात येत आहे व याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, हे विशेष.

आणखी वाचा : नागपूरच्या "लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिका-यांची शिकार

तर कार्यवाही करण्यात येईल!
कॉंक्रिटचे काम करण्यासाठी पांढऱ्या वाळूचा वापर करण्याचा नियम आहे. यानुसार, कॉंक्रिटचे काम करताना काळी वाळू वापरता येत नाही. जर कॉंक्रिटचे काम करताना काळी वाळू वापरण्यात येत असेल, त्यावर कार्यवाही करण्यात येईल.
श्री. देवासे
कनिष्ठ अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग, नरखेड

रस्ता व पूल मजबूत होण्याऐवजी कच्चे काम
अंबाडा ते बरडपवनी मार्ग गेला आहे. या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम सध्या शेताजवळ सुरू आहे. रस्ता व पूल मजबूत व्हावा, ही अपेक्षा आहे. पण, पुलाचे बांधकाम करीत असताना सर्रास काळ्या वाळूचा वापर करण्यात येत आहे.
-किशोर पुंड
ग्रामपंचायत सदस्य, थडीपवनी (बरडपवनी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blackberries in road construction; Why use "it" material without permission .