ओमेटिंग येत असल्याचे सांगून मुलाने आईच्या डोळ्यादेखत घेतली पुलावरून उडी; तुटला पाय

अनिल कांबळे
Friday, 20 November 2020

पाचव्या घटनेत, शबीरा बेगम साहेब अली (७४, रा. यशोधरानगर) यांना बाथरूममध्ये पडल्याने डाव्या पायाला जबर दुखापत झाली होती. त्यांना उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

नागपूर : एका युवकाने पुलावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, पुलावरून उडी घेतल्यामुळे युवकाचा पाय तुटला. ही खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी झिंगाबाई टाकळीतील बाबा फरिदनगर येथे घडली. रिंकू दास (वय ३०, रा. लष्करीबाग) असे जखमी युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू हा पेंटिंगचे काम करतो. गुरुवारी दुपारी रिंकू हा आईसोबत मोपेडने कोराडीला जात होता. बाबा फरिदनगरमधील पुलावर उलटी येत असल्याचे आईला सांगून रिंकू हा मोपेडवरून उतरला. आईला काही कळायच्या आधीच रिंकू याने पुलावरून उडी घेतली. त्याच्या आईने आरडाओरड केली. नागरिक जमले.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश ठाकरे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी रिंकू याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रिंकू याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तूर्त मानकापूर पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे.

दुसऱ्या घटनेत, शांतीनगर पोलिस ठाण्यांतर्गत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीला एका तरुणाने फूस लावून पळविल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी तरुण प्रेमनगर, झाडे चौक निवासी आसू नागपुरे (२४) यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.

बुधवारी सकाळी ११ वाजतादरम्यान मुलगी घरातून अचानक बेपत्ता झाली. मुलगी दिसत नसल्याने चिंतित कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दरम्यान, माहिती मिळाली की, आसू नावाच्या तरुणाशी तिची मैत्री होती आणि त्यानेच तिला पळवून नेले. यानंतर आसूविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात आली. तपास सुरू आहे.

अधिक वाचा - 23 नोव्हेंबरपासून शाळा सूरू, शिक्षकांना कोविड चाचणी बंधनकारक!

तिसऱ्या घटनेत, शांतीनगर ठाण्यांतर्गत मारवाडी वाडी निवासी संजय हरिकिशन केतुलवार (४०) यांची गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास अचानक प्रकृती खालावली. त्यांना उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

चौथ्या घटनेत अजनी ठाण्यांतर्गत लेक्चरर क्वॉर्टर, मेडिकल कॉलेज परिसर निवासी मायादेवी हिरालाल मोहाडिया (६५) यांना प्रकृती खालावल्याने मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. संबंधित ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाचव्या घटनेत, शबीरा बेगम साहेब अली (७४, रा. यशोधरानगर) यांना बाथरूममध्ये पडल्याने डाव्या पायाला जबर दुखापत झाली होती. त्यांना उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

क्लिक करा - अकोल्यातील भाजपचा बडा नेता काँग्रेसच्या गळाला, राष्ट्रवादीलाही गळती

सहाव्या घटनेत विजय दौलत वासनिक (५२, रा. बालाजी कॉलनी) हे सायंकाळी बाहेर फिरायला गेले होते. पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात भरती केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boy attempts suicide by jumping off bridge