प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रेयसीवर बलात्कार; महत्त्वाचे काम असल्याचे सांगून बोलवले घरी 

अनिल कांबळे 
Thursday, 25 February 2021

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल आणि पीडित तरुणी एकाच कॉलेजमध्ये शिकतात. जवळपास दीड वर्षांपासून दोघे एकमेकांना ओळखत असून दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. लॉकडाऊनच्या काळातही दोघे कुटुंबीयांच्या लपूनछपून एकमेकांना भेटत असत. 

नागपूर : कॉलेजमध्ये शिकत असताना प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवतीवर प्रियकराने बलात्कार केला. ही घटना गिट्टीखदान परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. निखिल मनोज शिंगणापुरे (१९, रा. श्रीकृष्णनगर, झिंगाबाई टाकळी) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

'भ्रष्टाचार हा तर सिस्टमचा भाग'; राज्याच्या पोलिस महासंचालकांचं धक्कादायक...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल आणि पीडित तरुणी एकाच कॉलेजमध्ये शिकतात. जवळपास दीड वर्षांपासून दोघे एकमेकांना ओळखत असून दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. लॉकडाऊनच्या काळातही दोघे कुटुंबीयांच्या लपूनछपून एकमेकांना भेटत असत. 

दरम्यान, १० जानेवारी रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास निखिलने पीडित तरुणीला कॉल करून महत्त्वाचे काम असल्याचे सांगून घरी बोलावले. यावेळी आरोपी निखिलच्या घरी कोणीही नव्हते. त्याचाच फायदा घेऊन निखिलने तिच्याशी अश्‍लील चाळे करीत शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच लग्न करण्याचे आमिष दाखवून बलात्कार केला. 

सावधान! जंगलात 'हाय अलर्ट' घोषित; अधिकारी...

त्यानंतर आरोपी निखिल तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. नकार दिल्यास तिला मारहाण करीत दमदाटी करीत होता. त्यामुळे ती गेल्या अनेक दिवसांपासून वासनेची बळी ठरत होती. यामुळे पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy misbehaved with girl in Nagpur