ब्रेकींग नागपूर ग्रामीण : अमरनगर या कामगारवसाहतीत कामगारांचा अहवाल "पॉझिटिव्ह, शोधमोहिम सुरू...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पुन्हा कारखाने स्थानीक कामगारांच्या भरवश्‍यावर सुरू करण्यात आले. परंतू एकमेकांच्या संपर्कात आल्याने "पॉझिटिव्ह' रूग्णांची संख्या वाढतच आहे. गुरूवारी दुपारपर्यंत एक कामगार बाधीत आढळल्याने खळबळ उडाली.

हिंगणा एमआयडीसी : चोरट्या पावलांनी एमआयडीसीत शिरला. एमआयडीसी परिसरातील लोकमान्य नगरातील एका मेडिकल स्टोअरच्या संचालकाचा कोरोना आजाराने मृत्यू झाल्यानंतर एमआयडीसीत पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढतच गेली. पारधी नगर, इसासनी, भिमनगरात रूग्ण आढळल्यानंतर गुरूवारी अमरनगरात एका कामगाराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे नागरिकांत खळबळ उडाली.

हेही वाचा : दगडी चाळीतून खासगी गाडीने नागपूरकडे निघाला "डॅडी', मात्र शहरात पोहोचताच...

एमआयडीसी परिसरात रूग्ण वाढण्याची शक्‍यता
चोरटया पावलांनी अमरनगरात कोरोना शिरला. लोकमान्यनगरातून सुरुवात करीत इसासनी ग्रामपंचायत हद्दीतील भीमनगरनंतर पारधीनगर आणि आता अमनगरात प्रवेश केल्याने कंपनी मालक व कामगारांत चिंता पसरली आहे.निलडोह ग्रामपंचायत परिसरातील अमरनगर येथील एक कामगार पॉझिटिव्ह आल्याने अमरनगर येथील नागरिकांत चिंतेची बाब पसरली आहे. इसासनी येथील कोरोना पॉझिटिव्ह आणि अमरनगर येथील एक कामगार दोघेही एकाच कंपनीत काम करीत होते. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर त्यांचा कारखान्यात संपर्क झाला. दोघांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे संपर्कात आलेल्यांना शोधण्यात आले.

आणखी वाचा : काटोलमध्ये शिक्षणाची गंगा प्रवाहित करणारे सुनील शिंदे

14 जणांना क्‍वारंटाईन
परिसरात संपर्कात आलेल्या एकूण 14 जणांना क्वांरटाइन करण्यात आले. त्यात दवाखान्यात नेणारा ऑटोचालक, दोन सहकारी कामगार, नातेवाईक, शेजारी यांचा यात समावेश असून, परिसरात सॅनिटरची फवारणी व इतरही उपाययोजना ग्रामविकास अधिकारी गुणवंत चिमोटे यांनी परिसराची पाहणी करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहे.

आणखी वाचा :ब्यूटी पॉर्लर बंद आहेत !घरीच वाढवा सौंदर्य

शोधमोहिम सुरूच
तहसीलदार संतोष खांडरे, खंडविकास अधिकारी महेद जुवारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. शेलकर, पोलिस निरीक्षक एमआयडीसीचे हेमंत खराबे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच कारखान्यातील बाधीतांच्या संपर्कात आलेल्यांची शोधमोहिम सुरू असून आणखी काही रूग्ण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. काटोल तालुक्‍यातील एक रूग्ण पॉझिटिव्ह आढळला. गुरूवारी दुपारपर्यंत अमरनगर येथे एक तर रिधोरा येथे एक रूग्ण आढळला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking Nagpur Rural: Report of workers in Amarnagar workers colony "Positive, search operation started ...