यशोगाथा : सीए टू उद्योजक व्हाया शेतकरी; अश्विनी औरंगाबादकर ठरल्या स्वयंसिद्धा

मंगेश गोमासे 
Thursday, 22 October 2020

शेती करणे म्हणजे तोट्याचा व्यवसाय. अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेती फायद्याची होईल असे म्हणता येणे जवळपास अशक्यच. त्यामुळे तरुणवर्ग आजकाल शेती करण्याकडे वळताना दिसत नाही.

नागपूर ः सीए म्हणून प्रॅक्टीस करताना बऱ्यापैकी पैसा मिळतो. मात्र, तो व्यवसाय सोडून चक्क शेतकरी होत, त्यातून निघालेल्या शेतमालापासून प्रक्रिया उद्योग करुन उत्पादन तयार करीत विकण्याचे काम अश्विनी औरंगाबादकर यांनी सुरू केले आहे. त्यांच्या या कार्याने त्या खऱ्या अर्थाने स्वयंसिद्धा ठरल्या आहेत.

शेती करणे म्हणजे तोट्याचा व्यवसाय. अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेती फायद्याची होईल असे म्हणता येणे जवळपास अशक्यच. त्यामुळे तरुणवर्ग आजकाल शेती करण्याकडे वळताना दिसत नाही. विशेष म्हणजे शेतकऱ्यांची मुलेही या व्यवसायाकडे पाठ फिरवतात. मात्र, अश्विनी औरंगाबादकर यांनी ही धारणा चुकीची ठरविली. 

हेही वाचा - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास  

एका क्षणात, जवळपास वीस वर्षाची ‘सीए‘ ची प्रॅक्टीस सोडून त्यांनी शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी त्यांनी २००८ साली शेती खरेदी केली. कसरेला पदर खोसून २०११ पासून त्यांनी पूर्णवेळ ऑर्गेनिक शेती करण्यास सुरुवात केली. घरात लागणारे धान्य व अन्य पिके शेतीमध्ये पिकविण्यास सुरुवात केली. यानंतर जोडधंदा म्हणून त्या शेतमालावरवर आधारीत प्रक्रिया उद्योगही सुरू केला शिवाय मिनी दालमिल विकत घेत, स्वतः पिकवलेली डाळ आणि इतरांची डाळ तयार करण्याचे काम त्यांनी सुरू केले.

याशिवाय अंबाडीचे लोणचे आणि सरबत तयार करणे, श्रीखंड, पनीर, तूप आणि नाचणी यातून बिस्किटे तयार करुन विकण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांचे उत्पादन प्रसिद्ध होऊ लागले. सगळं काही ऑर्गेनिक असल्याने लोकांनीही त्यांच्या उत्पादनाला पसंतीची दिली. आज केवळ नागपूरच नव्हे तर बाहेरही इतर ठिकाणी त्यांचे उत्पादन विकल्या जातात. त्यांच्या या उद्यमशीलतेने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

ठळक - छे छेऽऽ पेपर तर ‘नीट’ दिला; सहाशे गुणांची अपेक्षा असताता शून्य गुण कसे मिळणार, विद्यर्थिनी गेली हायकोर्टात

शेतीकडे कुणी वळताना दिसत नाही. मात्र, मुळात शेती करण्याची आवड असल्याने त्यासाठी जमिन विकत घेऊन २०११ पासून शेती करण्यास सुरुवात केली. आज, त्यातून येणाऱ्या शेतमालावर आधारित जोडधंदा करीत त्यातून विविध उत्पादने तयार केली आहेत.
अश्विनी औरंगाबादकर,
शेतकरी, उद्योजक.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CA to industrialist via farmer the success story of a woman