"तिने' केले रात्री आक्रमण, घातला धुमाकूळ, शेतकरी घाबरले..अन्‌...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

उमरी येथील बागायतदार शेतकरी संजय टेंबेकर यांनी परिवारासह शेतात शेकोट्या पेटवून धूर तयार केला, तर काही शेतकऱ्यांनी पिंप वाजवून थवे परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत काहींचे नुकसान झाल्याचे समजते. बागायतदार शेतकऱ्यांच्या संत्रा झाडाची बरीच पालवी नष्ट केल्याचे शेतकरी संजय टेंभेकर सांगतात.

सावनेर (जि.नागपूर) : जिल्ह्यातील नरखेड तालुक्‍यात टोळधाडीच्या आक्रमणामुळे सावनेर तालुक्‍यातही या कीटकांचे थवे येण्याची शक्‍यता वर्तविली जाताना अचानक पाचच्या सुमारास मौदा, रामटेक, पारशिवनीमार्गे अपेक्षेपेक्षा जास्त टोळकीटकांनी पानेगाव, खापा, आदमी शिर्डी, ठाणगाव, खुरगाव, परसोडी, उमरी पंढरी, जलालखेडा आदी भागांमध्ये धुमाकूळ घातला. त्यामुळे प्रशासन व आधीच धास्तावलेल्या शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे.

हे नक्‍कीच वाचाः तिच्या असहय वेदनाही झाल्या "लॉक'

शेतकऱ्यांना  केले सावध
उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी अनिल महंत, अश्विनी कोरे व कृषी सहायकांनी गावागावांतील शेतकऱ्यांना सावध केले. रात्रीच्या सुमारास तालुक्‍यातील उमरी शिवारात शनिवारी टोळकीटकांचे थवे तुटून पडल्याने ही माहिती पसरताच शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेऊन आपापल्यापरीने प्रयत्न केलेत. उमरी येथील बागायतदार शेतकरी संजय टेंबेकर यांनी परिवारासह शेतात शेकोट्या पेटवून धूर तयार केला, तर काही शेतकऱ्यांनी पिंप वाजवून थवे परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत काहींचे नुकसान झाल्याचे समजते. बागायतदार शेतकऱ्यांच्या संत्रा झाडाची बरीच पालवी नष्ट केल्याचे शेतकरी संजय टेंभेकर सांगतात.

हेही वाचा : आजारी असाल तर रेल्वेप्रवास टाळा

कृषी विभागात मनुष्यबळाचा तुटवडा
तालुका कृषी विभागांमध्ये एका कृषी सहायकास पाचपेक्षा जास्त गावाचा कारभार असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटामध्ये शर्तीचे प्रयत्न करूनही शेतकऱ्यांचे समाधान करणे शक्‍य नसल्याने तालुक्‍यातील शेतकरी कृषी विभागावर नाराजी व्यक्त करतात.

हेही वाचा : ऑनलाईन जुगार खेळणे पडले महागात,पडल्या बेडया

शेकोटया पेटवून थवे परतवण्याचा प्रयत्न
खापा व सावनेर येथील फायर ब्रिगेडच्या गाड्यांना बोलावण्यात आले आहे. मात्र, या कीटकांवर रात्रीच्या सुमारास स्प्रेइंग केले जाईल. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता, शेकोट्या पेटवून, डबे वाजवून थवे परतवण्यास मदत करावी.
-अनिल महंत
तालुका कृषी अधिकारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cable due to locust attack