पोलिस मोटर परिवहन विभागात सावळा गोंधळ; सीसीटीव्ही कॅमेरे बंद; वरिष्ठांचं दुर्लक्ष 

CCTV cameras are off in police motor department in Nagpur
CCTV cameras are off in police motor department in Nagpur

नागपूर ः पोलिस मुख्यालयाजवळील मोटर परिवहन विभागात (एमटीओ) मोठा सावळा गोंधळ सुरू आहे. पोलिस कर्मचारीच वाहनांची ॲडजेस्टमेंट म्हणून पोलिसांकडून चिरिमिरी घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्षानुवर्षे हाच प्रकार सुरू असून अनेक वाहनचालक पोलिस कर्मचारी या त्रासाला कंटाळले असून याबाबत वॉट्सॲप ग्रूपवर आपली खदखद व्यक्त करीत आहेत.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस विभागाची रक्तवाहिनी म्हणून एमटीओ विभागाकडे बघितल्या जाते. शहर पोलिस दलात असलेल्या सर्वच वाहनांची नस मोटर परीवहन विभागाच्या हातात असते. मात्र गेल्या काही महिण्यांपासून या विभागात ‘गडबड-गोंधळ’ सुरू झाला आहे. एमटीओ परीसरात शासकीय पेट्रोल पम्प आहे. येथूनच सर्व शासकीय वाहनात पेट्रोल-डिजल भरल्या जाते. त्यामध्ये पॅट्रोलिंग बाईकपासून ते डग्गा वाहनांचा समावेश आहे. 

एमटीओत काही पोलिस वाहनचालक पदावर कार्यरत आहेत. परंतु ते वाहन चालविण्यासाठी अनफिट असल्याचे सांगून कार्यालयात ‘वजनदार’ पोस्टवर बसून काम करतात. ‘गोंगल’गाय आणि पोटात पाय असलेल्या साहेबांचाही अशा चालक पोलिस कर्मचाऱ्यांना आशिर्वाद आहे. पोलिस ठाण्यासाठी कार्यरत असलेले पोलिस वाहने बिघडलेल्या स्थितीत असतात. तसेच चालक कर्मचारी वाहनांची लॉकबूकही व्यवस्थित मेंटन केल्या जात नाही. हा घोळ सांभाळण्यासाठी एमटीओमध्ये विशेष कर्मचारी नेमण्यात आला आहे. रजिस्टर आणि लॉकबूक व्यवस्थित करण्यासाठी चक्क चिरीमिरी द्यावी लागत असल्यामुळे अनेक वाहनचालक पोलिस कर्मचाऱ्यांनी एमटीओ विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

खासगी वाहनात भरल्या जाते पेट्रोल?

एमटीओतील शासकीय पेट्रोल पम्पावर काही खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनात पेट्रोल भरल्या जाते. त्यामुळे केवळ पेट्रोल पम्प वेंडींग मशिनकडे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आल्याची चर्चा आहे. येथील कर्मचारी डबकीत पेट्रोल काढत असून महिन्याच्या शेवटी एका गॅरेजवर पोलिस वाहन नेऊन नेऊन वाहनाचे रिडींगचे मिटर वाढविण्यासही बाध्य करीत असल्याचे बोलले जाते. 

साहेब...बदली एमटीओतच द्या !

एका पोलिस कर्मचाऱ्याची बदली अन्य ठिकाणी झाली होती. परंतु त्याने ‘साहेब...बदली एमटीओतच द्या’ असा पाढा वाचत अधिकाऱ्यांच्या घराचे उंबरठे झिजवले. त्याला बोगस मेडिकल सर्टीफिकेट जमविण्याची आयडीया देण्यात आली. त्यानुसार तो कर्मचारी आजही एमटीओतील मलाईदार पोस्टवर कार्यरत असल्याची चर्चा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com