esakal | शंभर गावात राबविणार स्वच्छता साक्षरता अभियान; ५ हजार लोकांपर्यंत पोहचण्याचे लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

cleanness and qualification campion in 100 villages

स्वच्छता विषयक साक्षरता मोहिमेच्या माध्यमातून ५ हजार लोकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ग्रामीण भागात घरगुती शौचालये बांधण्यासाठी नाबार्डने स्वच्छता व इतर वॉश उत्पादनांसाठी विशेष पुनर्वित योजना जाहीर केली

शंभर गावात राबविणार स्वच्छता साक्षरता अभियान; ५ हजार लोकांपर्यंत पोहचण्याचे लक्ष

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : स्वच्छता विषयक जागरुकता निर्माण करण्यासोबतच वर्तणुकीत बदल घडवून आणण्यासाठी आणि या क्षेत्रात संस्थात्मक कर्जपुरवठ्याच्या संधीविषयी माहिती देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त नाबार्डतर्फे शंभर गावात स्वच्छताविषयक साक्षरता मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक एल.एल. रावळ यांनी दिली.

स्वच्छता विषयक साक्षरता मोहिमेच्या माध्यमातून ५ हजार लोकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ग्रामीण भागात घरगुती शौचालये बांधण्यासाठी नाबार्डने स्वच्छता व इतर वॉश उत्पादनांसाठी विशेष पुनर्वित योजना जाहीर केली असून त्याअंतर्गत यावर्षासाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती रावळ यांनी दिली.

अधिक माहितीसाठी - घरात स्मार्ट टीव्ही वापरताय? तर आत्ताच व्हा सावध, अन्यथा येणार डोक्याला हात लावायची वेळ

मोहिमेमध्ये २ ऑक्टोबर ते २६ जानेवारी, २०२१ दरम्यान संपूर्ण देशात दोन हजार स्वच्छता साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या मोहिमेद्वारे एक लाख लोकांपर्यंत पोहोचण्यात येईल. राज्यातील शंभर गावात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. स्वच्छता व इतर वॉश उत्पादनांसाठी वाढविलेल्या भूस्तरीय कर्जासाठी सवलतीच्या दरात विशेष पुनर्वित योजना जाहीर केली. नाबार्डने स्वच्छ भारत मिशन (एसबीएम) ग्रामीण अंतर्गत देशभरात घरगुती शौचालये बांधण्यासाठी नाबार्डने आर्थिक सहाय्य केले आहे.

जलजीवनचे मिशन संचालक आर. विमला यांनी सांगितले की, स्वच्छता आणि स्वच्छतेच्या बाबतीत प्रत्येक जागरूक आणि सुशिक्षित नागरिक इतरांना प्रबोधन करण्यात महत्वाची भूमिका निभावू शकतो. जनतेच्या वर्तणुकीत बदल घडवून आणण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेसाठी जागरूकता वाढविण्याची आवश्यकता आहे. सामाजिक पायाभूत सुविधा विशेषत: स्वच्छतेसाठी बँक फायनान्सच्या माध्यमातून ओडीएफ-२ ला उद्योजकांनी पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

ठळक बातमी - मुंबई- पुणे जाणाऱ्यांसाठी खुशखबर! विदर्भ, अंबा एक्स्प्रेससह तब्बल २० रेल्वेगाड्या होणार सुरु

राज्य जल व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक राहूल साकोरे यांनी घन व द्रव कचरा व्यवस्थापन, शाळा, शासकीय कार्यालये आदी मधील संस्थागत शौचालये कव्हर करण्यासाठी बँकांना आवाहन केले. तसेच राज्य व केंद्र शासनाकडून उपलब्ध असलेल्या निधीतून बँका ग्रामपंचायतींना अर्थसहाय्य करावे. तसेच पाण्याचा योग्य वापर आणि स्वच्छता राखण्यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती दिली.

संपादन - अथर्व महांकाळ