`त्या` क्‍लिपमध्ये केवळ हनीट्रॅप एवढाच विषय नाही

clip of Honeytrap will present in court
clip of Honeytrap will present in court
Updated on

नागपूर : गंभीर विषयाचे राजकारण केले जात असेल तर हनीट्रॅप ऑडिओ क्‍लिपची उच्च न्यायालयाला चौकशी करण्याची विनंती करू, असा इशारा माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्राद्वारे दिला आहे. यात त्यांनी गृहमंत्र्यांचे राजकीय वक्तव्य खेदजनक असल्याचेही म्हटले आहे. 

संबंधित क्‍लिपमध्ये केवळ हनीट्रॅप एवढाच विषय नाही. त्यात गृहमंत्र्यांनी फोन केल्याने आरोपी सुटले, न्यायव्यवस्था मॅनेज करणे असे गंभीर आरोपही त्यात आहे. या आरोपांकडे सोयीस्कर दुर्लक्ष लक्ष करून राजकारण केले जात आहे. या प्रकरणाची आपण चौकशी करणार नसाल तर राज्याचे मुख्य न्यायाधीश आणि हायकोर्टाच्या रजिस्ट्रारकडे संबंधित क्‍लिप सादर करून चौकशीची विनंती केली जाईल, असे फडणवीस यांनी गृहमंत्री देशमुख यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

या प्रकरणाची चौकशी करण्याची आपण प्रथम मागणी केली होती. त्याचे उत्तरही सादर केले नाही. मात्र शुक्रवारी समाजमाध्यांवर आपल्या उत्तरात साहिल सय्यद हा भाजप नेत्यांचा भागीदार आहे. त्यांच्या अंतर्गत राजकारणातून ही क्‍लिप व्हायरल झाल्याचे म्हटले आहे. भाजपच्या नेत्यांसोबतचे छायाचित्रही सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमार्फत व्हायरल केल्या जात आहे.

सोबतच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचेही साहील सय्यद सोबतचे फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळे तो कुठल्या पक्षाचा या वादात आपण पडणार नाही. मात्र माझ्या पत्राच्या उत्तरात केलेले राजकीय आरोप दुदैवी आहे. माजी मंत्री बावनकुळे आणि माजी आमदार सुधाकर देशमुख यांनी आरोपाचे पुरावे द्या अन्यथा माफी मागा अशी मागणी केली आहे. 

न्यायालयाला विनंती करणार 
इतक्‍या गंभीर प्रकरणावर राजकीय आरोप करणे खेदजनक आहे. आपण या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार नसाल, न्यायव्यवस्थेला गृहित धरण्याची, मॅनेज करण्याची भाषा वापरणाऱ्यावर कारवाई केली जात नसेल उच्च न्यायालयामार्फत चौकशी करण्यास आपण न्यायालयाला विनंती करू असेही फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे. 

(संपादन : प्रशांत राॅय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com