बॅडमिंटन प्रशिक्षकांनी मनपा आयुक्तांना का केली कळकळीची विनंती.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : लॉकडाउनमुळे गेल्या चार महिन्यांपासून शहरातील सर्व बॅडमिंटन हॉल बंद आहेत. येथे होणाऱ्या बॅडमिंटन प्रशिक्षणावरच आमची रोजीरोटी अवलंबून आहे. त्यामुळे लवकरात लवकर इनडोअर हॉल सुरू करा, अशी विनंती प्रशिक्षकांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना केली आहे.


राज्य शासनाने नुकतेच आऊटडोअर टेनिस, मल्लखांब, योगासोबत आऊटडोअर बॅडमिंटनला परवानगी दिली. तेलंगणा सरकराने मात्र इनडोअर बॅडमिंटन सरावाला परवानगी दिली आहे. त्यामुळे इतर खेळांना परवानगी देण्यात द्यावी, अशी मागणी  करण्यात आली आहे. जयेंद्र ढोले, अजय दयाल, अमित राऊत, नितीन राऊत, विश्वजीत सिंग, रवी लोंढेकर, मोहन वहारे, सतीश, सतीश गंडलेवार व भूषण मुदलियार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात वरील मागणी केली.

ते म्हणाले, इनडोअर हॉल बंद असल्यामुळे आम्ही सर्व जण आर्थिक अडचणीत आहोत. शासनातर्फे अनेक योजना घोषित करण्यात आल्या, परंतु त्या योजनांचा आम्हाला काहीच लाभ झाला नाही. मार्च ते जून महिन्यात उन्हाळी शिबिरे आयोजित करीत होतो. त्यातून चांगली आमदनी होत होती. मात्र लॉकडाउनमुळे यंदा काहीच कमाई झाली नाही. या अडचणीच्या परिस्थितीत जवळच्या जमापुंजीवर आम्ही कसेबसे दिवस काढलेत. मात्र आता एकेक दिवस कठीण जात आहे. प्रशासनाने परवानगी दिल्यास सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करीत निवडक खेळाडूंसह सराव सुरू करू शकतो. या काळात खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेत आम्ही शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करू, अशी हमी प्रशिक्षकांनी यावेळी दिली.  

संपादन - नरेश शेळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com