ओडिशावरून येताच युवकाने भरविली काळजात धास्ती, काय केले त्याने...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जून 2020

तो युवक भानेगावातच सासूकडे किरायाने राहत होता. तो ओडिशा येथे एका कंपनीत वाहन चालकाचे काम करीत होता. 23 मेला युवक भानेगाव येथे आला. त्यानंतर त्याच दिवशी त्याची नागपूर शासकीय रुग्णालयात तपासणी करून नागपुरातच क्‍वारंटाईन करण्यात आले.

खापरखेडा /हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर) : ओडिशा येथून भानेगाव येथे आलेला युवकाचे रहस्य तब्बल 17 दिवसानंतर उघडकीस आले. खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भानेगाव ग्रामपंचायतच्या वॉर्ड नंबर 1 मध्ये सोमवारी या वृत्ताने खळबळ उडाली. विशेष म्हणजे "त्या' युवकाची मावस सासू ही ग्रामपंचायत भानेगाव येथे ग्रामपंचायत सदस्य आहे. ग्रामपंचायत सदस्या या युवकाच्या सासूच्या बहीण आहेत.

हेही वाचा : चार वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याच्या तयारीत होता युवक..मग अचानक

23मेला युवक आला भानेगावात
तो युवक भानेगावातच सासूकडे किरायाने राहत होता. तो ओडिशा येथे एका कंपनीत वाहन चालकाचे काम करीत होता. 23 मेला युवक भानेगाव येथे आला. त्यानंतर त्याच दिवशी त्याची नागपूर शासकीय रुग्णालयात तपासणी करून नागपुरातच क्‍वारंटाईन करण्यात आले. 26 तारखेला त्याला भानेगाव येथील बॅरि. शेषराव वानखेडे या महाविद्यालयात क्‍वारंटाईन ठेवण्यात आले. सोबत त्याच्या भानेगावतील 3 जण क्‍वारंटाईन होते. 4 दिवस ते बॅरि.शेषराव वानखेडे महाविद्यालय भानेगाव येथे क्‍वारंटाइन होते. मात्र चार दिवस महाविद्यालयात घालविल्यावर योग्य सोय नसल्याचे कारण समोर
केल्याने त्यांना होम क्‍वारंटाईन वेगळ्या रुममध्ये करण्यात आले. तेव्हापासून तो आणि त्याच्यासोबतचे तिघे घरीच होमक्‍वारंटाइन होते, हे विशेष. शनिवारी त्याचा पुन्हा स्वॅब टेस्ट घेण्यात आला. सोमवारी त्याचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. ग्रामपंचयाय भानेगाव प्रशासन , पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग चिचोली यांनी 100 मीटर सभोवतालचा परिसर सील केला.
हे नक्‍कीच वाचा : लालची कुठले..मुलाला ऑडी कार घेण्यासाठी मागत होते हुंडा, मात्र...

हिंगणा एमआयडीसी परिसरात कोरोना पॉझिटिव्ह
हिंगणा एमआयडीसी: इसासनी ग्रामपंचायतअंतर्गत भीमनगर येथील 60 वर्षीय वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह आढळला. या रुग्णाची कोणत्याही प्रकारची "टॅव्हल हिस्ट्री' नाही. घरीच आजारी पडल्याने मेडिकल रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले होते. तिथे सोमवारी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तहसीलदार संतोष खांडरे, खंडविकास अधिकारी महेंद्र जुवारे व एमआयडीसीचे ठाणेदार हेमंत खराबे यांनी परिसराची पाहणी केली. त्या वृद्ध व्यक्तीच्या कुटुंबातील 12 लोकांना क्‍वारंटाइन करण्यात आले आहे. तालुक्‍यातील डिगडोह, नीलडोह, वानाडोंगरी, वागधरानंतर आज पुन्हा नवीन इसासनी गावात कोरोनाचा शिरकाव झाला असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coming from Odisha, the youth was filled with fear, what did he do?