संवाद नसलेला पण बोलका "लाइव न्युक्‍स'

राघवेंद्र टोकेकर
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

कायमच दिल्लीत होणारा भारत रंग महोत्सव यंदा नागपुरात होत आहे. महोत्सवाच्या चवथ्या दिवशी अमेरिकेतील द सेंट्रल स्क्रुटिनाइजर्स नाट्यसंस्थेने या प्रयोगाचे सादरीकरण केले. प्रसिद्ध नाट्यकर्मी केव्हिन डुवाल यांनी दिग्दर्शित केलेल्या "लाईव्ह न्युक्‍स' नाटकृतीचा संपूर्ण डोलारा त्यांच्यासह टेलर ब्रुअर्टन यांनी सक्षमपणे तोलून धरला. अणुउर्जा प्रकल्पात कार्यरत दोन कर्मचाऱ्यांची ही कथा केवळ अभिनयाच्या बळावर तिही विनोदी शैलीत सादर करणे आव्हानात्मक होते.

नागपूर : नाट्यकृतीत अभिनय श्रेष्ठ की नाट्यसंहिता? असा प्रश्‍न नेहमीच विचारला जातो. अशी तुलना करण्याची वेळ येते तेव्हा रसिकवर्ग नाट्यप्रयोगाकडे विशिष्ट चश्‍मातून बघतो. रसिकांनी कधी अभिनय कौशल्याचे कौतुक केले तर काही वेळा दर्जेदार संहितेच्या पारड्यात माप टाकले. आज बुधवारी जरा उलटेच घडले. कारण रंगमंवर सादर झालेच्या नाट्य प्रयोगात संवाद नव्हते तरीही तो प्रचंड बोलका होता. केवळ देहबोलीच्या जोरावर दोन अमेरिकन कलाकारांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. नाट्यकृती होती "लाइव्ह न्युक्‍स' !

अवश्य वाचा - काच फोडली, नस कापली...अन्‌ पुढे

कायमच दिल्लीत होणारा भारत रंग महोत्सव यंदा नागपुरात होत आहे. महोत्सवाच्या चवथ्या दिवशी अमेरिकेतील द सेंट्रल स्क्रुटिनाइजर्स नाट्यसंस्थेने या प्रयोगाचे सादरीकरण केले. प्रसिद्ध नाट्यकर्मी केव्हिन डुवाल यांनी दिग्दर्शित केलेल्या "लाईव्ह न्युक्‍स' नाटकृतीचा संपूर्ण डोलारा त्यांच्यासह टेलर ब्रुअर्टन यांनी सक्षमपणे तोलून धरला. अणुउर्जा प्रकल्पात कार्यरत दोन कर्मचाऱ्यांची ही कथा केवळ अभिनयाच्या बळावर तिही विनोदी शैलीत सादर करणे आव्हानात्मक होते. हे आव्हान त्यांनी लीलया पेलल्यामुळे उपस्थित रसिक टाळ्यांच्या कडकडाटात प्रत्येकवेळी त्यांचे कौतुक करीत होते. एका अल्लड मित्राने केलेला घोळ निस्तरण्याचा प्रयत्न करणारा त्याचा सहकारी मित्र हा नाट्यकृतीचा गाभा. प्रकल्पातील यंत्रणेचे आवाज आणि केव्हिन आणि टेलर या दोघांचे अभिनय कौशल्य भारत रंग महोत्सवाची शान ठरले. ते कधी रडले तर कधी हसले. केव्हिन आणि टेलर यांनी अनपेक्षितपणे प्रेक्षकांमध्ये प्रवेश केला. हसत खेळत रंगमंचाचा ताबा घेतला. घामाघुम झालेल्या या दोन कलासाधकांच्या अभिनयात मात्र अडथळा जाणवला नाही.

असंख्य विचारांत गुतलेल्या व्यक्‍तीला ताळ्यावर आणणारा प्रयोग म्हणजे "लाइव्ह न्युक्‍स'. नाट्यकृतींमधील संवाद सादरीकरणाची दिशा ठरवतात. प्रेक्षक नाट्यप्रयोगात गुंग होतो त्यावेळी तो स्वत:हून काही तर्क लढवत असतो. यावेळी कानावर पडणारे संगीत आणि डोळ्यांना भावणारी प्रकाशयोजना कधीकधी नाट्यकृतीची भव्यता वाढवते. पण जेथे संवाद नसतील अन्‌ नेपथ्यदेखील नसेल त्या प्रयोगाचे काय ? तेथे नाट्यकृती रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते कलावंतांची देहबोली. यात हे दोघे कुठेही कमी पडले नाहीत. आजच्या प्रयोगाला दर्दी रसिकांसह नाट्यविश्‍वातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. संवाद नसले तरी प्रयोग बोलका असू शकते हाच संदेश "लाइव्ह न्युक्‍स' या नाट्यकृतीने दिला. प्रयोगाच्या सादरीकरणानंतर केव्हिन आणि टेलर या दोघांनी प्रेक्षकांशी संवादही साधला. नागपूरकरांच्या वतीने विनोद इंदुरकर यांनी त्यांचा सत्कार केला. केवळ देहबोलीच्या बळावर रसिकांना बेफाम हसवणारी ही जोडी दीर्घकाळ स्मरणार राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Communicative but talkative "live nuke"