दिवाळीमुळे प्रशासनात भरली धडकी; दुसऱ्या लाटेची व्यक्त केली जातेय भीती

राजेश प्रायकर
Tuesday, 10 November 2020

कोरोनाबळींची एकूण संख्या ३४८० पर्यंत पोहोचली. यात २४५८ शहरातील असून ५८३ ग्रामीण भागातील आहेत. दरम्यान बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक असल्याने प्रशासनाला काही अंशी दिलासा मिळाला. जिल्ह्यात आज ३२५ बाधित कोरोनामुक्त झाले.

नागपूर : कोरोनाचे संक्रमण अद्यापही कायम आहे. दररोज कोरोनाबळी व बाधितांच्या संख्येत फारसी घट होत नसल्याने तसेच दिवाळीतील नागरिकांची गर्दी बघता प्रशासनात धडकी भरली आहे.

सोमवारी जिल्ह्यात सात बळींची नोंद करण्यात आली. काल ग्रामीण भागात एका कोरोनाबळीची नोंद करण्यात आली. मात्र आज तिघांनी शेवटचा श्वास घेतला. बळींच्या संख्येतील या चढ-उतारामुळेही प्रशासन चिंतेत आहे. दरम्यान, जिल्ह्यात २०२ नवे बाधित आढळून आले. दिवाळीमुळे बाजारात वाढलेल्या गर्दीमुळे कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

जिल्ह्यात आज २०२ बाधितांची नोंद करण्यात आली. यात ग्रामीण भागातील ३८ तर शहरातील १६४ जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील ३ जण बाधित आढळून आले आहे. त्यामुळे बाधितांची संख्या १ लाख ५ हजार १४५ पर्यंत पोहोचली. ग्रामीण भागात तीन कोरोनाबळींची नोंद करण्यात आली. शहरातील ४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.

जिल्ह्याबाहेरील तिघांचा समावेश आहे. कोरोनाबळींची एकूण संख्या ३४८० पर्यंत पोहोचली. यात २४५८ शहरातील असून ५८३ ग्रामीण भागातील आहेत. दरम्यान बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक असल्याने प्रशासनाला काही अंशी दिलासा मिळाला. जिल्ह्यात आज ३२५ बाधित कोरोनामुक्त झाले. यात शहरातील १९६ तर ग्रामीण भागातील १२९ जणांचा समावेश आहे.

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

उपचार घेणाऱ्यांच्या संख्येत घट

दररोज आढळणाऱ्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्यांच्या संख्येतही सातत्याने घट होत आहे. रविवारी उपचार घेणाऱ्यांची संख्या ३ हजार ३३३ होती. सोमवारी यात घट झाली. जिल्ह्यात सध्या ३ हजार २०२ जण उपचार घेत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The concerned about the new corona patient