गुड न्यूज: आधार लिकिंगची अट झाली शिथिल; शेतकऱ्यांनो "हे' असे करा...

दिलीप चव्हाण
सोमवार, 15 जून 2020

फक्त कर्जमाफी यादीत नाव असेल तरी नवीन पीककर्ज देण्यात येणार असल्याचे अग्रणी जिल्हा बॅंक व्यवस्थापक विजय बैस यांनी स्पष्ट केले, यावरून शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

कुही (जि.नागपूर) : बॅंक ऑफ इंडियात पीककर्ज मिळण्यासाठी यापूर्वी कर्जमाफी यादीत नाव असले तरी आधार प्रमाणीकरणाची अट घातली होती. यावरून बॅंक अधिका-यांनी बरेच ताणले होते. मात्र, ती अट शिथिल करून फक्त कर्जमाफी यादीत नाव असेल तरी नवीन पीककर्ज देण्यात येणार असल्याचे अग्रणी जिल्हा बॅंक व्यवस्थापक विजय बैस यांनी स्पष्ट केले, यावरून शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.
अधिक वाचा : सुशांत, तू एवढया लवकर जायला नको होतं

सेवा केंद्रावर आधार कार्ड घेऊन जावे
महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली. या योजनेअंतर्गत कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांनी सेवा केंद्रावर आधार कार्ड घेऊन जावे, त्यानंतर आधार क्रमांक संगणक प्रणाली जोडला की, संबंधित शेतकऱ्यांनी कोणत्या बॅंकेकडून किती कर्ज घेतले, याची माहिती स्क्रीनवर येते. त्यामुळे कुणी नियमबाह्य पद्धतीने जर एकापेक्षा जास्त बॅंकांकडून कर्ज घेतले का, याची माहिती समोर येत असे. त्याची शहानिशा करून आपले सेवा केंद्र संचालक आधार प्रमाणीकरणाची पावती शेतकऱ्याला देत असते.

हेही वाचा : "ते' दृष्य पाहून मजुराची गेली तळपायाची आग मस्तकात, शेतमालकाची हत्या, काय होते कारण..

शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू नये
मात्र, आता लॉकडाउनमुळे "आपले सेवा केंद्रा'त आधार प्रमाणीकरणाचे पोर्टल बंद आहे. ते कधी सुरू होईल, याची शाश्वती देता येत नाही. म्हणून आधार प्रमाणीकरणाअभावी दुसऱ्या कर्जमाफी यादीत नाव असलेल्या शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू नये, म्हणून बॅंक ऑफ इंडियाने आधार प्रमाणीकरणाची अट शिथिल करून त्यात कर्जमाफी यादीत नाव असेल तर नवीन कर्ज देण्यात येणार असल्याचे अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक विजय बैस यांनी सांगितले.

हेही वाचा : सॅनिटायझरमुळे तुम्हालाही होतोय त्रास? करा हे उपाय

हवे असेल कर्ज तर असा करावा अर्ज
* ज्या कर्जमाफी यादीत नाव असेल त्या यादीची प्रत बॅंकेत घेऊन जावी.
* शेतीचा सातबारा नव्याने काढलेला आवश्‍यक आहे.
* बॅंकेत पडताळणी करून तुम्हाला "नो ड्यु सर्टिफिकेट'चा नमुना देतील.
* बॅंक अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार सांगितलेल्या संबंधित बॅंकेचे "नो ड्यु सर्टिफिकेट' सादर करा.
* त्यानंतर कर्जाची फाईल मिळेल. ती परिपूर्ण भरून द्यावी लागेल.
* बॅंकेच्या मागणीनुसार स्टॅम्प पेपरवर माहिती भरून स्वाक्षरी करून सादर करावी.
* पीककर्जाची रक्कम ही बॅंक अधिकारी तुमच्या शेतीचे क्षेत्र व तुम्ही घेत असलेले पीक यानुसार
निर्धारित करतील.
* संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली की आठ दिवसांत कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.

हेही वाचा : बहुजन विकासमंत्री म्हणतात, यापूर्वीचं सरकार महाहेराफेरी -1

शेकडो शेतकऱ्यांना लाभ होईल
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आधार प्रमाणीकरणाची अट शिथिल करण्याचा निर्णय बॅंक ऑफ
इंडियाने घेतल्यामुळे याचा लाभ शेकडो शेतकऱ्यांना होईल.
-राजानंद कावळे
अध्यक्ष, नागपूर जिल्हा शेतकरी शेतमजूर संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The condition of base leaking became loose