हागणदारीमुक्त जिल्हा अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यात सव्वा लाख शौचालयांची निर्मिती

Construction of one and a half lakh toilets in the district
Construction of one and a half lakh toilets in the district

नागपूर : हागणदारीमुक्त जिल्हा अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यात केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे २०१४ ते २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील ७६८ वर ग्रामपंचायतींमध्ये सुमारे एक लाख २५ हजार कुटुंबांकडे शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे.

राज्यातील हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राखण्यासाठी तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ ची सुरुवात करण्यात आलेली आहे.

शासनाने १९ नोव्हेंबर २०२० रोजी जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सार्वजनिक, वैयक्तिक, शाळा, अंगणवाडी शौचालयासंदर्भात विशेष अभियान राबविण्याचे निर्धारित केलेले आहे. हे अभियान १७ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले असून, ते २७ नोव्हेंबर २०२० पर्यंत राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या सामुदायिक, सार्वजनिक, वैयक्तिक, शाळा व अंगणवाडी शौचालय अशा सुविधांचा शाश्वत वापर, योग्य देखभाल, दुरुस्ती व आवश्यकतेनुसार आनुषंगिक सुविधांची उपलब्धता व निधी वाटपावर भर देऊन शौचालयाचे महत्त्व अधोरेखित करणारे आणि उपलब्ध शौचालयांचा शाश्वत वापर होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम अभियान कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत.

अभियानाला आपल्या तालुक्यात सुरुवात करण्यापूर्वी तालुक्यातील सर्व सार्वजनिक शौचालय, शाळा, अंगणवाडी व वैयक्तिक स्तरावर उपलब्ध असलेल्या शौचालय सुविधांची सद्यःस्थिती लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात यावी, याकरिता विविध प्रसार माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत सदर अभियान लोकाभिमुख होईल यासाठी प्रयत्न करावा.

व्ही.सी.द्वारे उपक्रमांची माहिती आपल्या स्तरावरून देण्यात यावी. ग्रामपंचायतींना भेटी देऊन उपक्रम सहभागासाठी यंत्रणेला प्रोत्साहित करावे, असे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल किटे यांनी केले आहे.

२५ हजार शौचालयांची निर्मिती

पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जवळपास सव्वा लाखांवर शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. तर टप्पा-२ अंतर्गत विभागाला २०२० ते २०२५ पर्यंत आणखी २५ हजार शौचालयांच्या निर्मितीचा लक्ष्यांक असून, यामध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात विभागाकडून ४ हजारांवर शौचालयांची निर्मिती करण्यात येणार आहे. तर उर्वरित २१ हजार शैचालयांची पुढील चार वर्षांमध्ये निर्मिती करण्यात येणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com