esakal | महापालिकेत कंत्राटदारांचे आंदोलन, मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडून देयके देण्यास टाळाटाळ
sakal

बोलून बातमी शोधा

contractor agitation in nagpur municipal corporation

देयकांमध्ये अनेक त्रुटी काढून कंत्राटदारांना बिलापासून वंचित ठेवण्याचे काम मुख्य लेखा व वित्त अधिकारी करीत असल्याचेही आयुक्तांना दिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे. कंत्राटदारांवरील हा अन्याय दूर करावा, अशी मागणीही आयुक्तांकडे करण्यात आली.

महापालिकेत कंत्राटदारांचे आंदोलन, मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडून देयके देण्यास टाळाटाळ

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : आयुक्तांसोबत पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम देण्याची चर्चा झाल्यानंतर महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडून देयके देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे कंत्राटदारांची दिवाळी अंधारात गेली असून आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी कंत्राटदारांनी महापालिकेत मेणबत्ती पेटवून आंदोलन केले. 

हेही वाचा - 'चीज'वरही मिळतेय कर्ज, पण ही बँक नेमकी आहे कुठे?

महापालिकेतील नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा दिवाळीनिमित्त केलेल्या विकासकामांची देयके देण्याची विनंती आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली होती. आयुक्तांनी नोव्हेंबरपर्यंत झालेल्या कामांपैकी कंत्राटदारांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे कंत्राटदारांत उत्साह होता. परंतु, मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी पाच लाख रुपयांपेक्षा कमी थकीत देयकच विचारात घेण्यात येईल, अशी भूमिका घेतली. त्यामुळे ऐन दिवाळीत कंत्राटदारांना मोठा धक्का बसला आहे. कंत्राटदारांना त्रास देण्यात येत असल्याचा आरोप असोसिएशनचे अध्यक्षांनी केला आहे.

हेही वाचा -  बाजारपेठेत खरेदीचा दीपोत्सव; शेतकरी आणि शेतमजुरांची...

याशिवाय देयकांमध्ये अनेक त्रुटी काढून कंत्राटदारांना बिलापासून वंचित ठेवण्याचे काम मुख्य लेखा व वित्त अधिकारी करीत असल्याचेही आयुक्तांना दिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे. कंत्राटदारांवरील हा अन्याय दूर करावा, अशी मागणीही आयुक्तांकडे करण्यात आली. मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी कंत्राटदारांनी सिव्हिल लाइन येथील मनपा मुख्यालयात आज सायंकाळी मेणबत्ती पेटवून आंदोलन केले.