तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसोबत दुजाभाव; खासगी, शासकीय मानधनाचे दर वेगवेगळे

मंगेश गोमासे
Thursday, 21 January 2021

शासकीय महाविद्यालयातील तासिका तत्त्वांवरील अध्यापकांना आठवड्याच्या जास्तीत-जास्त सात तासिका दिल्या जातात. तसेच खासगी अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वांवरील अध्यापकांना नऊ तासिका देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे

नागपूर : शासन निर्णयाद्वारे शासकीय महाविद्यालयातील तासिका तत्त्वांवरील प्राध्यापकांच्या मानधनात व तासिकांच्या संख्येत कोणतीच वाढ झालेली नाही. त्यामुळे असा दुजाभाव का, असा प्रश्‍न या प्राध्यापकांद्वारे उपस्थित होत आहे. 

हेही वाचा - मन सुन्न करणारी घटना! 'डिअर मॉम...आय लव्ह यू' लिहून सोडला जीव, आईनं फोडला एकच हंबरडा

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार उच्च शिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखालील खासगी अनुदानित महाविद्यालयातील विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी तासिका तत्त्वावरील अध्यापकांना प्रदान करावयाच्या मानधनाचे दर वाढविले. मात्र, शासनाला आपल्याच विभागातील शासकीय महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा विसर पडला आहे. शासकीय महाविद्यालयातील तासिका तत्त्वांवरील अध्यापकांना आठवड्याच्या जास्तीत-जास्त सात तासिका दिल्या जातात. तसेच खासगी अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वांवरील अध्यापकांना नऊ तासिका देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

हेही वाचा - महिलेच्या घरात घुसून डोक्यावर ठेवली बंदूक अन् केली विचित्र मागणी; घटनेनं परिसरात खळबळ   

विशेष म्हणजे एका शैक्षणिक सत्रासाठी जास्तीत-जास्त ९ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, शासकीय महाविद्यालयांमध्ये ऑगस्ट ते फेब्रुवारी पर्यंतच नियुक्ती दिली जाते. यामध्ये दिवाळीच्या एक महिन्याच्या व इतर सुट्ट्या असतात. त्यामुळे हा काळ खऱ्या अर्थाने सहा ते सात महिन्यांचाच असतो. तसेच शासकीय महाविद्यालयातील तासिका तत्त्वांवरील प्राध्यापकांचे मानधन दरमहा देण्याचे आदेश असताना दोन हप्त्यांमध्ये विभागून देण्यात येते. दुसरीकडे खासगी अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांना पदवी अभ्यासक्रमासाठी प्रति तासिका ५०० तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ६०० रुपये दिले जातात. मात्र, शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांना २४० आणि ३०० रुपये प्रतितासिका देण्यात येते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: contractual professor not having enough honorarium in nagpur