ब्रेकिंग नागपूर जिल्हा : बापरे ! "या' नगरात एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोनाचा डंख...

वाडी : एकाच कुटुंबातील दहा सदस्य पॉझिटिव्ह आढळल्यानंतर परिसरात आरोग्य अधिकारी पाहणी करताना.
वाडी : एकाच कुटुंबातील दहा सदस्य पॉझिटिव्ह आढळल्यानंतर परिसरात आरोग्य अधिकारी पाहणी करताना.


वाडी (जि.नागपूर):  सुरक्षित समजली जाणारी वाडी आता असुरक्षिततेच्या दिशेला वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत 5 कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत असताना शनिवारी एकाच कुटुंबातील 9 जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने तहसील प्रशासन, आरोग्य विभाग व हे कुटुंब देखील हादरून गेले आहे. एवढ्या बाधीत सदस्यांचा प्राथमिक संपर्क शोधून कार्यवाही करणे हे प्रशासन व आरोग्य विभागासाठी जिकरीचे ठरणार आहे.

अधिक वाचा : बिअर बार चालकांसाठी आनंदाची बातमी, सरकारच्या नव्या सूचना जाहीर वाचा ...

नऊ जणांचे विलगीकरण
प्राप्त माहितीनुसार धम्मकीर्ती नगर येथील निवासी एका कुटुंबातील 31 वर्षीय युवक व त्याचा लावा क्षेत्रातील महादेवनगर येथील राज्य राखीव पोलिस दलातील मित्र या दोघांना खासगी तपासणीनंतर कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्याने व्याहाड आरोग्य विभागाचे डॉ. सचिन हेमके, डॉ.सुषमा धुर्वे यांच्या पथकाने अधिकारी, तहसीलदार मोहन टिकले, खंडविकास अधिकारी किरण कोवे, मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या दिशानिर्देश व सहकार्याने नागपूरला उपचारासाठी पाठविले. सोबतच धम्मकीर्ती नगर येथील बाधितांच्या कुटुंबातील आई, बहिणी, भाऊ या 9 जणांना देखील नागपूरला संस्थागत विलगिकरन केंद्रात दाखल केले. तेथे या सर्वांची तपासणी केंद्रावर तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल शनिवारी "पॉझिटिव्ह' आल्याची माहिती वाडी प्रशासन व व्याहाड आरोग्य विभागाला कळताच खळबळ उडाली.

अधिक वाचा: यांचाही होतो वाढदिवस...

रूग्णसंख्या पोहोचली 15वर
प्रसाकीय अधिकारी यांनी तातडीने तहसील अधिकारी डॉ.हेमके व पथकाला आवश्‍यक सुचना देऊन कार्यवाहीचे निर्देश दिले. या अनुषंगाने या पथकाने बाधितांशी संपर्क करून त्यांच्या जवळून संपर्कात आलेल्या 5 जणांना तातडीने संस्थागत क्‍वारंटाईन व तपासणीसाठी घेऊन गेले. या नउही बाधीत सदस्यांना नागपूरच्या मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केल्याचे समजते. त्यामुळे वाडीत आता नवनीतनगर, सुरक्षानगर, सत्यसाई सोसयटीतील 5 बाधीत रुग्ण धरून संख्या 15 वर पोहचली आहे. ती निश्‍चितच चिंताजनक आहे.

बाधितांचा संपर्क मोठा
या संदर्भात डॉ.सचिन हेमके यांनी वाडीच्या नागरिकांना अधिक गंभीर होण्याची व सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. असे प्रकरण लपवू नका, प्रतिष्ठचेही करू नका. जेवढया लवकर बाधीत स्पष्ट होईल तेवढे लवकर विलगिकरण केल्यास उपचार व त्याच्या परिसरात संपर्क पसरणार नाही, ही बाब नागरिकानी समजून घेणे गरजेचे आहे. या बाधीत कुटुंबापैकी 1 महिला सदस्य धुणी-भांडी, 1 महिला सदस्य गॅस वितरण कार्यालय, तर 1 पुरुष सदस्य वाडी नगरपरिषदमध्ये कार्यरत असल्याने संपर्क क्षेत्र मोठे असल्याचे स्पष्ट होते. वाडीत कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता व्याहाड आरोग्य केंद्राने आता वाडी परिसरातच कोरोना नमुना तपासणी करणे व त्वरित अहवाल जाहिर करण्याची गरज आहे. डॉ.सचिन हेमके यांनी वाडी परिसरात अशा चाचण्या व तपासणी करण्याचे नियोजन करण्याची तयारी असल्याचे सांगितले.

हेही वाचा : सीआयडी चौकशीस कारण की...

सहकार्य करा !

या संदर्भात ही वार्ता हळूहळू धम्मकीर्ती नगर व वाडी परिसरात पसरताच चिंता दिसून आली. एवढी गंभीर बाब असूनही अनेक जण लॉकडाउनचे पालन करताना व गंभीर नसल्याचे दुर्दैवी चित्र बाजार व सार्वजनिक जागेवर दिसून येत आहे. नागरिकांनी नियमांचे कठोर पालन करावे. सहकार्य न केल्यास नगरपरिषद प्रशासना नाईलाजास्तव जबरदस्तीचे पर्याय राहणार नाही, असे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी सांगितले. अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून नागरिकानी स्वतःच सहकार्य करणे अत्यावश्‍यक दिसून येत आहे.

...तर कठोर पाऊल उचलावे लागेल
वाडी परिसरात अनपेक्षितपणे कोरोना प्रसार व रुग्णवाढ ही चिंतेची बाब आहे. नगरपरिषद, तहसील प्रशासन व आरोग्य विभाग फैलाव रोकण्यासाठी दिवसरात्र प्रयत्नशील आहे. मात्र नागरिकांचे सहकार्य आवशक आहे. दिलेले नियम व सूचना याचे गंभीरतेने पालन करणे गरजेचे आहे. स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास "जनता कर्प्यु' सारखे कठोर नियम लावणे भाग पडेल.
जुम्मा प्यारेवाले
मुख्याधिकारी, वाडी न.प.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com