उपराजधानीत कोरोनाचा दहावा बळी; रुग्णांची संख्या 507वर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

आतापर्यंत दहा मृत्यूची नोंद नागपूरच्या कोरोना डायरीत झाली आहे. संचारबंदीत शिथिलता देण्यात आली. यामुळे नागरिक रस्त्यावर उतरले. ही बाब प्रशासनाची चिंता वाढविणारी ठरू शकते. एकीकडे लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे. दुसरीकडे तुकाराम मुंढे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. 

नागपूर : शहरात गेल्या शनिवारी सकाळी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. यात एका भिक्षेकरीचाही समावेश होता. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच कोरोनाबाधितांचा आलेखही सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. एक आठवड्यांनी शनिवारी (ता. 30) भिक्षेकरीचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे. 

पोलिसांना सेंटर एव्हेन्यू रोडवरील गांधी चौकात जवळपास 50 वर्षे वय असलेला एक भिक्षेरी बेशुद्ध दिसला. यामुळे पोलिसांनी त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले. त्याचे पोट फुगले होते. त्याच्यावर उपचार केल्यानंतर तो बरा होत असतानाच श्‍वसनाचा त्रास व्हायला सुरुवात झाली. यामुळे सीएमओ डॉ. रणवीर यादव यांनी कोरोना चाचणी करण्यास सांगितले. त्याचा चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तेव्हापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होता.

महत्त्वाची बातमी -  सासूने हात पकडले, सासऱ्याने अंगावर रॉकेल शिंपडले, पती गळ्यावर वार करणार तोच...

कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचारामुळे बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. दुसरीकडे शहरात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असतानाचा मृत्यूचीही संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत दहा मृत्यूची नोंद नागपूरच्या कोरोना डायरीत झाली आहे. संचारबंदीत शिथिलता देण्यात आली. यामुळे नागरिक रस्त्यावर उतरले. ही बाब प्रशासनाची चिंता वाढविणारी ठरू शकते. एकीकडे लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे. दुसरीकडे तुकाराम मुंढे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. 

मध्यंतरी नागपूर रेड झोनमधून निघाल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. यामुळे नागरिक आनंदी झाले होते. मात्र, तुकाराम मुंढे यांनी नागपुरात पहिलेसारखेच नियम कायम राहतील, अशी घोषणा केली. यामुळे नागपूरकरांची पार निराशा झाली. इतक्‍या कडक प्रमाणात लॉकडाउन असतानाही रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे लॉकडाउन न काढलेच बरे होईल, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. 

मे महिन्यात सर्वाधित मृत्यू

नागपुरात रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचा आकडा कमी आहे. पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर दुसरा मृत्यू व्हाला बराच वेळ लागला. यामुळे शहरात मृत्यूदर कमी होते. मात्र, मे महिन्यात अद्याप सात जणांनी आपला जीव गमवला आहे. त्या तुलनेत एप्रिल महिन्यात फक्‍त दोनच व्यक्‍तींचा जीव गेला होता.

क्लिक करा - Video : धन्यवाद, आभार व्यक्‍त करताना त्यांना रडू कोसळत; न्यायालयानेही केले कौतुक, कोण आहेत 'ते'?

एकणू बाधित पाचशे सात

शहरात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आजपर्यंत 507 रुग्ण रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दहा जणांचा मृत्यूही झाला आहे. नागपुरात रुग्ण बरे होण्याचा वेग इतरांच्या तुलनेत चांगला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णांचा मृत्यू होत असल्याने चिंता वाढत आहे. 

शहरातील कोरोनाचे मृत्यू

  • - 5 एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील रोजी 68 व्यक्तीचा मृत्यू 
  • - 29 एप्रिल रोजी मोमिनपुरा येथील 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 
  • - 5 मे रोजी पार्वतीनगर येथील 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू 
  • - 11 मे रोजी पांढराबोडी येथील 29 वर्षीय युवकाचा मृत्यू 
  • - 16 मे रोजी गड्डीगोदाम येथील 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 
  • - 17 मे रोजी शांतीनगर येथील 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
  • - 18 मे रोजी मोमीनपुरा येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • - 25 मे सतरंजीपुरा येथील 71 वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • - 30 मे रोजी सेंटर एव्हेन्यू रोडवरील भिक्षेकरीचा मृत्यू 

नरखेड तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्‍यातील मन्नाथखेडी येथे आठवडाभरापूर्वी काही लोकं मुंबईहून गावात आले होते. नरखेड येथे घेण्यात आलेल्या स्वॉबचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. एकूण घेतलेल्या 96 नमुन्यांपैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे नरखेड तालुक्‍यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patient died on Saturday at Nagpur