मतदारांनो, कोरोनाबाधित असाल तरी करता येईल मतदान; जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली वेळ

नीलेश डोये
Sunday, 29 November 2020

प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही झोनमधील मतदान केंद्रावर हे कर्मचारी मतदाराला त्यांचे नाव व मतदान केंद्र  शोधण्यासाठी मदत करतील.  नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे, याची एक दिवस आधीच माहिती करून घेण्याचे आवाहनही  जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नागपूर : येत्या मंगळवारी १ डिसेंबरला होणाऱ्या पदवीधर मतदानाच्या दिवशी मतदारांचे नाव शोधण्यासाठी वेळ लागत असतो. त्यामुळे मतदानाच्या एक दिवसाआधी शहरात महानगरपालीकेच्यावतीने दहा झोननिहाय मतदान केंद्रावर संगणक व टॅबसहीत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय मतदानाच्या दिवशीही सुद्धा केंद्र सुरू असेल, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही झोनमधील मतदान केंद्रावर हे कर्मचारी मतदाराला त्यांचे नाव व मतदान केंद्र  शोधण्यासाठी मदत करतील.  नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे, याची एक दिवस आधीच माहिती करून घेण्याचे आवाहनही  जिल्हा प्रशासनाने केले आहे. भारत निवडणूक आयोगाने  नागपूर पदवीधर मतदारसंघांमध्ये एकूण सहा जिल्ह्यांसाठी मतदान केंद्राची अंतिम यादी जाहीर केली आहे. ३२२ केंद्रावर मतदान होणार आहे.

हेही वाचा - 'आधी सोयाबीन सडला, कापूसही करपला; आता तुरीवरही अळ्यांचा प्रादुर्भाव, सांगा आम्ही...

कोरोना संदर्भातील सूचनांचे पालन करून हे मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहे. नव्या यादीनुसार आता नागपूर जिल्ह्यामध्ये १६४, भंडारा जिल्ह्यांमध्ये ३१, गोंदिया जिल्ह्यामध्ये २१, वर्धा जिल्ह्यामध्ये ३५, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ५०, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये २१ मतदान केंद्र आहेत. 

हेही वाचा - अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : प्रचार तोफा थंडावल्या, काउंटडाऊन सुरू

पदवीधरांनो मतदान करा :  डॉ.संजीवकुमार
लोकशाही बळकट व समृद्ध करण्यासाठी येत्या १ डिसेंबर रोजी होणाऱ्या पदवीधर निवडणुकीत  नोंदणी केलेल्या पदवीधर मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तसेच विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार यांनी आज केले. कोरोना सुरक्षा मानकांनुसार पदवीधर निवडणूक घेण्यात येणार आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून निवडणुकीचा हक्क अधिक सुरक्षीतपणे मतदारांना बजावता येणार आहे. विभागात  दोन लाख सहा हजार मतदार असून त्यापैकी  १लक्ष १० हजार मतदार हे  नागपूर जिल्ह्यातील आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive patients can vote in last hour in nagpur graduate constituency election