भगवान राम, सीता, लक्ष्मण यांना कोरोनाचा धोका! वाचा सविस्तर...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

नागपुर ग्रामीणमध्ये हिंगणा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरल्यानंतर सावनेरसह सोनालीतही कोरोनाने धडक दिली. यापाठोपाठ कन्हान, कामठीतही कोरोनाचे रुग्ण आढळून आले. उमरेड कोरोनाच्या नकाशावर नव्हते, परंतु येथेही बुधवारपेठेत मुंबईतून आलेला व्यक्ती कोरोनाबाधित आढळला.

नागपूर : लॉकडाउन शिथिल झाले. सारे जनजीवन सामान्य होत असताना कोरोनाच्या विषाणूंचा विळखा सैल होईल असे वाटत होते. परंतु या अनलॉकचा विपरित परिणाम दिसून येत आहे. अनलॉकनंतर शहरातून आढळणारा कोरोना खेड्यापर्यंत पोहचत आहे. शनिवारी 22 जण बाधित आढळले. तर कोरोनाबाधितांची संख्या 1423 वर पोहचली आहे. विशेष असे की, नागपुरातील रामटेकच्या गडावर कोरोनाचा पोहचला आहे. वर्धमाननगर, माधवनगरसहित नागपुरातील दीडशे वस्त्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 

उपराजधानीत 11 मार्च ते 27 जून या साडेतीन महिन्यात कोरोना बाधितांची संख्या जलद गतीने वाढली. तुलनेत केवळ 23 मृत्यूची नोंद झाली आहे. प्रारंभी बजाजनगर ही एकच वस्ती कोरोनाच्या नकाशावर होती. परंतु अल्पावधित संपूर्ण नागपूर कोरोनाच्या नकाशावर आले आहे. साडेतीन महिन्यात शहरातील सव्वोशे वस्त्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.

सविस्तर वाचा - कायद्याला झुगारून आई-वडिलांनी बाळाला दिले दत्तक; वय अवघे पंधरा दिवस, आजी-आजोबांनी आक्षेप घेतल्याने...

शनिवारी मेयो, खासगी प्रयोगशाळा, पशुवैद्यकीय आणि एम्सच्या प्रयोगशाळेतून कोरोनाबाधित आढळले. पुर्व नागपुरात सतंरजीपुरा येथे हॉटस्पॉट तयार झाले. तर मध्य नागपुरात मोमीनपुरा आणि नाईक तलाव आणि टिमकीदेखील हॉटस्पॉट ठरली. उत्तर नागपुरात लष्करीबागत तर दक्षिण नागपुरात चंद्रमणीनगरात कोरोनाचे हॉटस्पॉट तयार होण्याच्या मार्गावर होते.

नागपुर ग्रामीणमध्ये हिंगणा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरल्यानंतर सावनेरसह सोनालीतही कोरोनाने धडक दिली. यापाठोपाठ कन्हान, कामठीतही कोरोनाचे रुग्ण आढळून आले. उमरेड कोरोनाच्या नकाशावर नव्हते, परंतु येथेही बुधवारपेठेत मुंबईतून आलेला व्यक्ती कोरोनाबाधित आढळला. रामटेकमध्ये एक जण कोरोनाबाधित आढळला असल्याची आरोग्य विभागात नोंद झाली आहे. 

77 वर्षाचा वृद्ध कोरोनामुक्‍त 

मेयो रुग्णालयातून शनिवारी पाच जणांनी कोरोनाला हरवले. एका 77 वर्षाच्या वृद्धाने कोरोनावर मात केली. विशेष म्हणजे या रुग्णाला विविध आजारही होते. परंतु रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे या वृद्ध व्यक्तीने कोरोनाला हरवले. याशिवाय 5 वर्षाच्या चिमुकल्यासहित आठ पुरुषांनी तर 2 महिलांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1059 वर पोहचली आहे.

हेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...

चाचण्यांची गती मंदावली 

मेडिकल, पशुवैद्यक प्रयोगशाळा, नीरी आणि एम्स अशा पाच प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी तयार करण्यात आल्या आहेत. मात्र कोरोनाच्या चाचण्यांची गती मंद झाली आहे. पाच प्रयोगशाळेत अवघ्या 126 निदान चाचण्या झाल्या आहेत. एखादा दिवस चाचण्यांचा 700 पर्यंतचा उच्चांक होतो. शनिवारी अवघ्या 126 चाचण्यांवर थांबा लागला. विलगीकरणातील संशयितांची संख्या पाहाता ही गती मंद झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona on Ramtek Fort at Nagpur