नागपुरात कोरोना चाचण्यांचा टक्का कमी; २४ तासांत ८ मृत्यू; ३२९ नवीन रुग्णांची भर

केवल जीवनतारे 
Sunday, 17 January 2021

जिल्ह्यात २४ तासांत दगावलेल्या ८ कोरोना बाधितांमध्ये शहरातील ३, ग्रामीण भागातील २ तर जिल्ह्याबाहेरच्या तिघांचा समावेश आहे. कोरोनाने आतापर्यंत जिल्ह्यात ४ हजार ७२ जणांचा मृत्यू झाला. तर नवीन ३२९ रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ३० हजार ४६९ वर पोहचला. 

नागपूर ः आरोग्यमंत्र्यांनी नागपुरात चाचण्या वाढविण्याची सूचना वारंवार केली होती. परंतु, रुग्णवाढीत काही दिवसांची उसंत मिळाली की, चाचण्यांची संख्या कमी होते. रविवारी दिवसभरात शहरात २ हजार ७२४ तर ग्रामीण भागात ४०८ अशा ३ हजार १३२ संशयितांची चाचणी करण्यात आली. यात ३२९ जण बाधित आढळले तर २४ तासांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला.

जाणून घ्या - आधी कापली हाताची नस, रुणालयात जाताना अचानक घेतली उडी अन् घडला थरकाप उडवणारा प्रसंग

जिल्ह्यात २४ तासांत दगावलेल्या ८ कोरोना बाधितांमध्ये शहरातील ३, ग्रामीण भागातील २ तर जिल्ह्याबाहेरच्या तिघांचा समावेश आहे. कोरोनाने आतापर्यंत जिल्ह्यात ४ हजार ७२ जणांचा मृत्यू झाला. तर नवीन ३२९ रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ३० हजार ४६९ वर पोहचला. 

यात शहरातील आजपर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ३ हजार ५७८ तर ग्रामीण २६ हजार ५६ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील ८३५ रुग्ण आहेत. दिवसभरात शहरातील ३३९, ग्रामीण ३६ अशा ३७५ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या ९७ हजार ६८२ झाली. ग्रामीण भागातील २४ हजार ५०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. एकूण कोरोनामुक्तांची संख्या १ लाख २२ हजार १८४ वर पोहचली.

हेही वाचा - क्रूर नियतीचा खेळ! चिमुकल्यांच्या डोक्यावरून क्षणार्धात हरवलं माय-बापाचं छत्र अन् घडली जीव जाळून टाकणारी घटना 

गृह विलगीकरणात तीन हजारांहून कमी

गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार २१३ झाली. यातील २ हजार ९९४ कोरोनाबाधित रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. ८९० रुग्णांवर मेयो, मेडिकलसह विविध कोरोना रुग्णालयांत उपचार सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona testing is less in Nagpur