esakal | जिल्ह्याबाहेरील व्यापाऱ्यांच्या कापसाची देवळीत विक्री; ३० डिसेंबरपर्यंत तब्बल एक लाख ४५ हजार क्विंटल खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

cotton which out of district are sold in deoli Wardha district

येथील जय बजरंग ऍग्रो प्रोसेसमध्ये १७ हजार, संजय इंडस्ट्रीज २० हजार, मधू इंडस्ट्रीज ५ हजार ४००, एस. आर. कॉटन ४ हजार ६०० आणि श्रीकृष्ण जिनिंगमध्ये ७ हजार ८०० क्विंटल कापूस खासगी व्यापाऱ्यांनी खरेदी केला.

जिल्ह्याबाहेरील व्यापाऱ्यांच्या कापसाची देवळीत विक्री; ३० डिसेंबरपर्यंत तब्बल एक लाख ४५ हजार क्विंटल खरेदी

sakal_logo
By
शेख सत्तार

देवळी, (जि. वर्धा) : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये जिल्ह्याबाहेरील राळेगाव, कळंब, दारव्हा, आर्वी, नेर आदी गावांतील कापूस व्यापारी कापूस विक्रीस आणत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये कापसाची आवक वाढली आहे. यंदा ३० डिसेंबरपर्यंत एक लाख ४५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. तर काही व्यापारी व शेतकऱ्यांनी थेट कापूस जिनिंग मालकास विकला असल्याचे सांगण्यात आले. भारतीय कापूस निगमन आतापर्यंत ८८ हजार क्‍विंटल कापूस खरेदी केला आहे.

येथील जय बजरंग ऍग्रो प्रोसेसमध्ये १७ हजार, संजय इंडस्ट्रीज २० हजार, मधू इंडस्ट्रीज ५ हजार ४००, एस. आर. कॉटन ४ हजार ६०० आणि श्रीकृष्ण जिनिंगमध्ये ७ हजार ८०० क्विंटल कापूस खासगी व्यापाऱ्यांनी खरेदी केला. यंदा कापसाचे उत्पादन कमी असून शेतकऱ्यांचा सीसीआयकडे कापूस विक्रीचा कल असल्याने व्यापारीसुद्धा कमी आले. 

नक्की वाचा -'त्यांच्या' गाडीचा हॉर्न ऐकताच महामार्गावर जमतात असंख्य कावळे; याला दातृत्व म्हणावं की मैत्री

गत वर्षी एक महिना कापूस खरेदी उशिरा सुरू झाली होती. गेल्या वर्षी ३० डिसेंबर २०१९ पर्यंत एक लाख ११ हजार क्‍विटंल कापूस विक्रीला आला. मात्र, नंतर कापसाची आवक वाढली आणि हंगामाच्या अखेर ४ लाख ७१ हजार क्विटंल कापूस खरेदी करण्यात आला. यातील अर्ध्यापेक्षा जास्त कापूस दोन लाख ९९ हजार ४५७ क्‍विंटल कापूस सीसीआय ने खरेदी केला होता. खासगीत कापसाला कमी भाव मिळत असल्याने जास्तीत जास्त कापूस सीसीआयला विकला होता. कोरोनामुळे पावसाळ्यातसुद्धा कापूस खरेदी सुरू ठेवावी लागली होती.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाच्या उत्पादन निम्मेच होईल, असा अंदा वर्तविला जात आहे. बोंडअळीमुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या शेतात रोटावेटर फिरवून गव्हाची पेरणी केली. सध्या विक्रीस येणारा कापूस बाहेर जिल्ह्यातील आहे. मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचा कापूस सीसीआयला विक्रीकरिता स्थानिक दलाल सक्रिय आहे. कट्टीचा धंदा सध्या जोमात सुरू आहे. प्रतिक्विटंल मागे १०० ते २०० रुपये कटणी कापूस आपल्या नावे कापूस लावण्यात येतो. सध्या मार्केटमध्ये दररोज पाच हजार क्विटंलची आवक येत आहे. यातील ६० ते ७० टक्‍के कापूस बाहेर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा असतो. देवळी मार्केट मध्ये सदोष ढोक, आशिष खडसे, आशिष गावंडे, सुनील राऊत, अशोक दरणे, अनिल ओझा आदी कर्मचारी शेतकऱ्यांना कापूस विक्री व्यवस्थेत सहकार्य करित आहे.

अधिक माहितीसाठी - ‘माझ्यावर जबाबदारी आहे; परंतु, माझा नाइलाज आहे’ अशी चिठ्ठी लिहून बिल्डरची आत्महत्या

गत वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाचे उत्पादन कमी होणार आहे. डिसेंबरच्या अखेरीस मार्केट यार्डमध्ये कापसाची आवक मंदावली आहे. १ जानेवारीपासून सीसीआय कापसाच्या प्रथम ग्रेडला ५ हजार ७२५ रुपये भाव देणार आहे.
नरेंद्र देसले,
ग्रेडर, देवळी 

संपादन - अथर्व महांकाळ