शेवट तो बनता है... सकाळी मटण, रात्री चिकन अन्‌ उरलच तर...

Crowd of citizens at the meat shop in Nagpur
Crowd of citizens at the meat shop in Nagpur
Updated on

नागपूर : श्रावण महिना मंगळवारपासून सुरू होत आहे. तो उपासतापासांचा सात्त्विक महिना मानला जातो. श्रावणापासून गणेश विसर्जनापर्यंत सुमारे दीड महिना दारू व मांसाहारापासून लांब राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यंदा भाद्रपदाला जोडूनच अधिकमास सुरू होणार आहे. त्यातही दारू व मांसाहार वर्ज्य ठेवले जाते. शौकिनांना परत मांसाहारासाठी यावर्षी तब्बल अडीच महिने वाट बघावी लागणार आहे. यामुळेच यंदाचा श्रावणापूर्वीचा शेवटचा रविवार वेगळेच महत्त्व घेऊन आला अन्‌ "शेवट तो बनता है' म्हणत... 

श्रावणापूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने राज्यभरात रविवारी गटारी साजरी करण्यात आली. नागपुरात गटारी अमावस्येची प्रथा नसली तरी शेवटचा "बनता' दिवस शौकिनांनी सेलिब्रेट केला. अडीच महिने चिकन, मटण खायला मिळणार नाही म्हणून नागरिकांनी मांसाहाराच्या दुकानात चांगलीच गर्दी केली होती. काही ग्राहक चिकन आणि मटण दोन्ही सोबत नेतान दिसून आले.

सकाळपासूनच शहरातील मोमिनपुरा, सक्करदार, मानेवाडा, त्रिमूर्तीनगर, जयताळा, जरीपटका, गांधीबाग, सदर, मंगळवारसह सर्वच भागातील चिकन, मटणाच्या दुकानांवर गर्दी दिसून आली. दारूची दुकाने उघडताच तिथेही रांगा लागल्याचे दिसले. त्यात साऱ्यांना सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडला होता. 

सकाळच्या सत्रापासूनच सेलिब्रेशन प्रारंभ झाले. काही महाभागांनी दारूच्या दुकानांसमोरच आडोशा शोधून पेग भरले आणि घाईघाईत रिचवलेही. काहींनी आप्तेष्टांना बोलावून घरगुती स्वरूपाच्या पार्ट्या केल्या. सायंकाळपासून रात्रीपर्यंत सेलिब्रेशन पूर्ण रंगात होते. कोरोनाची परिस्थिती भयंकर असून त्याची जाणीवही साऱ्यांनाच होती. परंतु, अनेकांनी एक दिवस सोशल डिस्टन्सिंगलाच लॉकडाउन करीत आजचा दिवस सेलिब्रेट केला.

अनेकांची गैरसोय

घरी मांसाहार शिजविणे किंवा बाहेरून आणून खाण्यावर प्रतिबंध असणाऱ्यांचीही संख्या शहरात मोठी आहे. अशा घरांमधील शौकीन मंडळी बाहेरच ताव मारून इच्छा भागवितात. यंदा मात्र लॉकडाउनमुळे हॉटेल बंदच असल्याने अशा शौकीनांची गैरसोय झाली. बाका प्रसंग असल्याने नातेसंबंधित किंवा मित्रांकडे व्यथा मांडून अशा मंडळींनी आपली "व्यवस्था' करवून घेतली. काहींच्या पदरात मात्र निराशाच पडली. 

दोन टाईमची सोय केली भाऊ...
एक तास रांगेत लागतो आणि मटण विकत घतले. शेवटचा दिवस असल्याने पुन्हा खायला मिळणार नाही या विचारातून चिकनही विकत घेऊन टाकलं. पुन्हा रांगेत लागण्याची गरज नाही. आता सकाळी आणि रात्री अशी दोनवेळची सोय झाली. सकाळी मटण तर रात्री चिकन खणार आहे. पूर्ण दिवस मजेत जाईल रे भावा... 
- एक ग्राहक

आज नियम नाही रे...

गटारी साजरी करण्यासाठी मांसाहाराच्या दुकानासमोर नागरिकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. सगळ्यांची एकाच वेळी गर्दी केल्याने सोशल डिस्टनसिंगचा पार फज्जा उडालाचे पाहायला मिळाले. नागरिकांच्या चेहऱ्यावर कोरोनाची भीती मुळीच दिसून आली नाही. शौकिनांना भलतेच भरते आल्याचे जाणवत होते. आज नियम नाही रे... असे म्हणत ग्राहक एकमेकांच्या मागे लागत होते. 

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com