बर्थडे बॉयचे असेही नशीब; अर्थे सेलीब्रेशन घरी उर्वरित पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये

टीम ई सकाळ
Friday, 23 October 2020

एका किराणा दुकानात काम करणाऱ्या एका महिलेचा खून करण्यासाठी निघाले होते, अशी प्राथमिक माहिती आरोपींनी दिली. वाहतूक पोलीस निरीक्षक पराग पोटे, किशोर चुटे, रमन आत्राम, वर्षा व सुनीता यांनी आरोपींना ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी अंबाझरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

नागपूर : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे तसेच सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणे एका युवकाला चांगलेच भोवले. फोटो व्हायरल होताच पोलिसांना तासाभरात बर्थडे बॉयला अटक केली. त्याच्याकडून तलवारसुध्दा जप्त केली. निखिल लोकचंद पटले (१९, रा. भांडेवाडी, भोलेनगर, पारडी) असे अटकेतील बर्थडे बॉयचे नाव आहे.

निखिल पटलेचा २१ तारखेला वाढदिवस होता. मध्यरात्री साडेबारा वाजता त्याने काही मित्रांना सांगून बर्थडे सेलीब्रेशन करण्याचे ठरविले. त्याने चार मोठमोठे केक आणले. घरी आलेल्या मित्रांसमोर त्याने तलवार काढली आणि चारही केक कापत बर्थडे साजरा केला. या सेलीब्रेशनचे फोटो वॉट्सॲपवर व्हायरल झाले. गुन्हे शाखेचे सचिन आंधळे यांनी लगेच वरिष्ठांना माहिती देत आरोपीच्या घरी छापा घातला. छाप्यात तलवार मिळून आली. उर्वरित बर्थडे सेलीब्रेशन बर्थडे बॉयला पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये टाकून करण्यात आले.

जाणून घ्या - अबब! नागपुरात जन्माला आले चक्क पाच किलो वजनाचे बाळ

वाहतूक पोलिसांनी वाचवले हत्याकांड

महिलेचा खून करण्याच्या उद्देशाने निघालेल्या दोघांना सीताबर्डी वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चाकू सापडले. वाहतूक पोलिस पॅट्रोलिंग करीत असताना दोन दुचाकीस्वारांवर संशय आला. वाहतूक कारवाई करण्याच्या उद्देशाने त्यांना अडवले असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नव्हते.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे चाकू सापडला. त्यांची कसून चौकशी केली असता ते अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका किराणा दुकानात काम करणाऱ्या एका महिलेचा खून करण्यासाठी निघाले होते, अशी प्राथमिक माहिती आरोपींनी दिली. वाहतूक पोलीस निरीक्षक पराग पोटे, किशोर चुटे, रमन आत्राम, वर्षा व सुनीता यांनी आरोपींना ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी अंबाझरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

सविस्तर वाचा -  Video गावाचा सुपुत्र निघाला आर्मीत; गावकऱ्यांनी दिला आगळावेगळा निरोप

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

कळमेश्वर-नागपूर माहामार्गावर दहेगाव शिवारात दुचाकीला मागाहून येणाऱ्याया अज्ञात कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. २२) सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान घडली. मृताचे नाव चंद्रभान मारोती भांगे (वय ७०, रा. देशमुख ले-आउट वार्ड क्र. १० कळमेश्वर) असे असून ते सेवानिवृत्त लाईनमन होता.

क्लिक करा - मोबाईलवर लिंक पाठवल्यानंतर आला फोन; माहिती भरल्यानंतर तरुणी लागली रडायला

तरुणाची गळफास लावून आत्महत्या

नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रमानगर येथे २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरातील स्वयंपाक खोलीत स्कार्फने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी दुपाती दीड वाजतादरम्यान ही घटना उघडकीस आली. सुगत सुनील गजभिये (रा. रमानगर कामठी) असे मृताचे नाव आहे. मृताच्या घरातील मंडळी दुपार झोपले असताना त्याने स्वयंपाक खोलीत गळफास लावून घेतला. काही वेळाने त्याची आई स्वयंपाकखोलीत गेली असता तिला धक्का बसला.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cutting cake with a sword is expensive