esakal | नदीच्या पात्रात मृत कोंबड्यांचा खच; सावळी (खुर्द) येथील धक्कादायक प्रकार

बोलून बातमी शोधा

Dead hens are found in river in Nagpur District

‘बर्ड फ्लू’च्या दहशतीमुळे पोल्ट्री व्यावसायिकांनी काय करावे, काय करू नये याच्या मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन विभागाच्यातवीने व्यावसायीक व सामान्य नागरिकांना देण्यात आल्या आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका होणार नाही अशी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. 

नदीच्या पात्रात मृत कोंबड्यांचा खच; सावळी (खुर्द) येथील धक्कादायक प्रकार
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कळमेश्वर (जि. नागपूर) ः सावळी (खुर्द) हद्दीतून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीच्या पात्रात अज्ञात व्यक्तीने शेकडो मृत कोंबड्या फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे़. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नदी पात्रात मृत कोंबड्या फेकणारा ‘तो’ महाभाग कोण? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे़

‘बर्ड फ्लू’च्या दहशतीमुळे पोल्ट्री व्यावसायिकांनी काय करावे, काय करू नये याच्या मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन विभागाच्यातवीने व्यावसायीक व सामान्य नागरिकांना देण्यात आल्या आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका होणार नाही अशी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. 

अधिक माहितीसाठी - मन सुन्न करणारं वास्तव! जीवाचं रान करून वाढवलेल्या जीवांना खड्ड्यात पुरण्याची आली वेळ

मात्र, तालुक्यातील सावळी (खुर्द) हद्दीतून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीच्या पात्रात अज्ञात व्यावसायिकाने मृत कोंबड्या फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक दोन नव्हे तर शेकडो मृतकोंबड्या नदीपात्रात फेकल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नदीचे पाणी दूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़

नक्की वाचा - नवनीत राणांनी घेतला उखाणा अन् उपस्थितांच्या तोंडी एकच वाक्य 'वाह वाह क्या बात है!'

यासंदर्भात पशू चिकित्सालयाच्या सहा़ आयुक्त डॉ. जयश्री भुगांवकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, शुक्रवारी यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर कार्यालयातील डॉ. विद्याधर घनबहादुर व इतर चार सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळाचे निरीक्षण केले. कोंबड्यांची वाहनातून ने-आण करताना चेंगराचेंगरी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा व त्यानंतर व्यावसायिकाने मृत कोंबड्या नदीपात्रात फेकल्या असाव्या अशा संशय आहे.

संपादन - अथर्व महांकाळ