साळीसोबत प्रस्थापित केले अनैतिक संबंध अन्‌ केले गर्भवती, नंतर...

pregnant
pregnant

नागपूर : तिसऱ्यांदा गर्भवती असल्यामुळे बहिणीने मदतीसाठी चुलत बहिणीला गावावरून बोलावले. बहीण मुलांचा सांभाळ करेल आणि घरकामातही मदत होईल असा उद्देश होता. मात्र, भाऊजीची वाईट नजर साळीवर पडली. पत्नी गर्भवती असताना साळीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सततच्या संबंधामुळे साळीही गर्भवती झाली. हे पाप लपवण्यासाठी घरीच प्रसूती करण्यात आली. मात्र, प्रसूतीच्या काही वेळानी बाळाचा मृत्यू झाला. ही घटना गिट्टीखदान हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी भाऊजीला गजाआड केले आहे. 

आरोपी भाऊजी रामकिसन चौधरी (35) हा मूळचा बालाघाट येथील रहिवासी आहे. तो कामानिमित्त नागपुरातील गिट्टीखदान परिसरात राहतो. तसेच मजुरीचे करतो. रामकिसनला दोन मुले आहेत. त्यातच पत्नी लक्ष्मी ही तिसऱ्यांदा गर्भवती राहिली. गरोदरपणात घरकामात मदत होण्यासाठी व मुलांकडे लक्ष ठेवण्यासाठी लक्ष्मीने गावावरून 21 वर्षीय चुलत बहिणीला बोलावून घेतले. बहिणीला मदतीची गरज असल्यामुळे ती आली. ती बहीण आणि मुलांकडे लक्ष देण्यासह घरकामही करीत होती. 

दरम्यानच्या काळात रामकिसन आणि साळी यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. पत्नी गर्भवती असल्याचा लाभ घेत भाऊजीने साळीचे शोषण केले. सततच्या शारीरिक संबंधामुळे लक्ष्मीला तिसरा मुलगा होईपर्यंत तिची बहीणही गर्भवती राहिली. गुरुवारी मध्यरात्री तिने बाळाला जन्म दिला. मात्र, काही वेळातच बाळाचा मृत्यू झाला. पोलिसांनी रामकिसन चौधरी (35), त्याची पत्नी लक्ष्मी चौधरी (32) व रामकिसनची बहीण सजावती चौधरी (22) या तिघांविरुद्ध अपत्याचे अस्तित्व लपविण्याचा गुन्हा दाखल करीत रामकिसनला अटक केली. 

बदनामी पोटी घरीच केली प्रसूती

मदतीसाठी घरी आलेली बहीण पतीकडूनच गर्भवती झाली. स्वत: गर्भवती असल्यामुळे लक्ष्मीला पतीचे हे क्रृत्य उशीरा समजले. यानंतर बहिणीने घरी जाण्याचा आग्रह धरला. आपली व पतीची बदनामी होईल. परिसरातील नागरिक व नातेवाईक थू-थू करीत अशी भीती नमुद आरोपींना वाटू लागली. बदनामीच्या धाकाने तसेच कृत्यावर पडदा टाकण्याच्या दृष्टीने पीडितेला गावी जाण्यापासून रोखले व घरीच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.

असे फुटले बिंग

पीडितेची अवस्था आणि किंचाळ्यांमुळे घरात काहीतरी सुरू असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. पीडितेने बाळाला जन्म दिला; मात्र, जन्मानंतर काही वेळातच बाळाची हालचाल बंद झाली. आरोपींनी कसलाही विचार न करता बाळाचे पार्थिव सुखसागर सोसायटी, पाण्याच्या टाकीच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर उघड्यावरच फेकून दिले. बाळाचा कसलाच आवाज येत नसल्याने शेजाऱ्यांना शंका अजूनची वाढली. कुणीतरी माहिती देताच पोलिस वस्तीत धडकले. चौधरीच्या घरी पोहोचताच आरोपींचे बिंग फुटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com