जिल्ह्यात अवघे ४८२ कोरोनाबाधित; शहरातील मृत्यूचा आकडा दोन हजार पार

केवल जीवनतारे
Monday, 12 October 2020

जिल्हात बाधितांची संख्या ८६ हजार ५७२ वर पोहोचली आहे. यात शहरातील ६८ हजार २३, ग्रामीण १८ हजार ६९ रुग्णांचा समावेश आहे. मेयो, मेडिकल, एम्स आणि खासगी रुग्णालयात दगावलेल्ंयांची संख्या अडीच हजारांपेक्षा जास्त आहे. उर्वरित बाधितांचे मृत्यू घरीच दगावलेले, अपघाती व इतर कारणांमुळे दगावलेले कोरोनाबाधित आहेत.

नागपूर : पंधरा दिवसांपूर्वी नागपुरात दोन हजार कोरोनाबाधितांची नोंद दर दिवसाला होत होती. परंतु, आता कोरोनाचा विळखा बऱ्यापैकी सैल झाल्याचे दिसून येत आहे. बाधितांच्या संख्येत ७५ टक्के घट झाली आहे. रविवारी (ता. ११) केवळ ४८२ बाधितांची नोंद झाली. मात्र, मृत्यूमध्ये काहीशी वाढ झाली असून दिवसभरात कोरोनाने २३ जणांचा बळी घेतला. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा २ हजार ७९० वर पोहोचला आहे. तर, शहरातील मृत्यूचा आकडा २ हजारच्या पार झाला आहे. ग्रामीण भागातील मृत्यू पाचशे पार झाले. तर आतापर्यंत बाधितांची संख्या ८६ हजार ५७२ वर पोहोचली आहे.

नागपुरात या आठवड्यात दुसऱ्यांदा कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा दुपटीने वाढला आहे. रविवारी ४८२ बाधित आढळले आहेत. त्या तुलनेत ९२३ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे कोरोनामुक्तांची संख्या ७५ हजार ६४४ झाली आहे. कोरोनामुक्तांचा नागपुरातील टक्का ८७.३७ वर पोहचला आहे.

हेही वाचा - ज्येष्ठांना सोडून कनिष्ठांना ‘ठाणेदारी’?; ज्युनिअर जोमात, सीनिअर कोमात

दिवसभरात जिल्हात दगावलेल्या २३ कोरोनाबाधितांपैकी शहरातील १० जण मेयो, मेडिकलमध्ये दगावले आहेत. तर ग्रामीण भागातील ७ जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. जिल्हाबाहेरील ६ रुग्ण आज मृत्यू पावले. आजपर्यंतच्या शहरातील कोरोनामृतांची संख्या २ हजार १, ग्रामीण ५०६ वर पोहचली आहे. जिल्हाबाहेरून मेयो, मेडिकलसह खासगीत रेफर केलेल्या २९८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

नागपुरात दर दिवसाच्या तुलनेत चाचण्यांची संख्या कायम असताना बाधितांचा टक्का घसरला आहे. यामुळे कोरोना कमी होत आहे, यावर तज्ञांचे एकमत होत आहे. मात्र, बोलायला कोणीही तयार नाही. दिवसभरात शहरात ४ हजार १३३, ग्रामीणला १ हजार ८२६ आरटीपीसीआर आणि रॅपीड अँटिजेन चाचण्या झाल्या. शहरात केवळ ३३७ तर ग्रामीण भागात १३९, जिल्हाबाहेरील ६ अशा एकूण ४८२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले.

अधिक माहितीसाठी - मुलांनी आईला प्रश्न विचारताच सर्वच झाले शांत; काही सेकंदात आजी-आजोबांनी फोडला हंबरडा

जिल्हात बाधितांची संख्या ८६ हजार ५७२ वर पोहोचली आहे. यात शहरातील ६८ हजार २३, ग्रामीण १८ हजार ६९ रुग्णांचा समावेश आहे. मेयो, मेडिकल, एम्स आणि खासगी रुग्णालयात दगावलेल्ंयांची संख्या अडीच हजारांपेक्षा जास्त आहे. उर्वरित बाधितांचे मृत्यू घरीच दगावलेले, अपघाती व इतर कारणांमुळे दगावलेले कोरोनाबाधित आहेत.

भरती रुग्ण घटले

नागपुरात आता बाधितांमध्ये घट होत असताना मेयो, मेडिकलसह शंभरावर खासगी रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची संख्या घटली आहे. २ हजार २२५ कोरोनाबाधित रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ५ हजार ४३१ जण घरीच उपचार घेत आहेत. १५ दिवसांपूर्वी १० हजारावर कोरोनाबाधित गृहविलगीकरणात होते. जवळपास पन्नास टक्क्यांनी गृहविलगीकरणातील रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही दिलासादायक बाब आहे.

ठळक बातमी - दोन्ही मुले ढसा ढसा रडत म्हणाले, ‘मम्मीऽऽ मम्मी पप्पाला काय झालं, ते कधी येणार’

आतापर्यंतचे मृत्यू

  • मेडिकलमध्ये झालेले मृत्यू -११८०
  • मेयोत झालेले मृत्यू-१०८०
  • एम्समध्ये झालेले मृत्यू - २०
  • खासगीत झालेले मृत्यू -४१४

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The death toll in the city has crossed Two Thousand