जीवलग दोस्ताने केले दुश्‍मनापेक्षाही भयंकर कृत्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जून 2020

"ते' दोघे जिवश्‍च, कंठश्‍च मित्र होते. त्यापैकी एक भयंकर तापट स्वभावाचा. क्षणाक्षणाला क्रोध व्यक्‍त करणारा. एके दिवशी ते दोघेही फिरायला गेले असता क्षुल्लक कारणावरून त्याला राग आला. अन्‌ मग त्याने केले मित्राशी माणूसकीला न शोभणारे वर्तन...

सावनेर (जि.नागपूर):  तालुक्‍यातील केळवद पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नांदोरी शिवारात शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास आपसात झालेल्या वादात दोन मित्रांनी मिळून एका मित्राची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केली. मृतदेह नजिकच्या विहिरीत फेकल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच केळवदचे ठाणेदार सुरेश मट्टामी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून विहिरीतील मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणीसाठी सावनेरला रवाना केले.

हेही वाचा : भयंकर ! पब्जीचा स्कोअर न झाल्याने नागपुरातील युवकाने घेतला गळफास

मित्रांत असे काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विक्की बाबा धराडे (वय32) व सतिष पाडुरंग ताजने (वय45) तसेच राजू मुरलीधर जोगी(वय33, सर्व, राहणार नांदोरी) हे खास होते. त्यातील आरोपी विक्की याची पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. काही दिवसांपासून तो नांदोरी येथे आई वडीलांजवळ राहत होता. आई वडीलासह गावतही इतरांना त्रास द्यायचा. त्याविरुद्ध अनेक तक्रारीची नोंद असल्याची माहिती मिाळाली. त्याला दारू पिण्याचा शोैक आहे. त्याचा स्वभाव तापट असल्याने नेहमीच या ना त्या कारणावरून आईवडील व गावक-यांशी त्याचे खटके उडायचे.

हे नक्‍कीच वाचा : कोरोनातून सावरलेल्या नागपूरच्या या व्यक्‍तीने केले "प्लाझमा' दान

विहरीत पडल्याचा आवाज अन्‌ शेजारी झाले अवाक
शनिवारी दुपारी तिघांना सोबत बघितल्याची माहिती असून दीडच्या सुमारास गावालागतच्या विहरीजवळ प्रत्यक्षदर्शीस राजूला कोणीतरी विहिरीत टाकत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घटनेची माहिती शेत मालक व पोलिस पाटिल यांना दिली. घटनास्थळी जाऊन बघितले असता शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह तसेच विहिरी काठी रक्ताने माखलेला दगड़ आढळून आला. तोवर केळवद पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी सावनेर येथे रवाना केला. मित्रांनी मित्राचा खून कशासाठी केला हे अद्याप उघड झाले नाही.याबाबत परिसरात विविध चर्चांना उत आला आहे. केळवदचे ठाणेदार सुरेश मट्टामी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A deed done by a close friend is worse than an enemy