
नागपूर : स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेतील विद्यार्थ्यांकडून चुकीच्या पद्धतीने वसूल केलेली एक कोटी ४४ लाख ९३ हजार १२७ रुपयांची रक्कम शाळेने परत करावी, असे आदेश शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिले आहेत. नारायणा शाळेनंतर शहरातील शिक्षण संस्थेवर कारवाईचा बडगा उगारल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एखाद्या शिक्षण संस्थेवरील एवढ्या मोठ्या स्तरावरील ही अलीकडच्या काळातील दुसरी कारवाई आहे.
शाळेचे व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांना दिलेल्या आदेशात २०१७-१८ आणि २०१९-२० या वर्षांमध्ये वसूल केलेल्या अतिरिक्त शुल्काची रक्कम परत करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, २०१४-१५ आणि २०१६-१७ मध्ये आकारणी केलेल्या शैक्षणिक शुल्काची रक्कम तसेच सत्र शुल्काची अतिरिक्त आकारणी केलेली रक्कम निश्चित करण्यासाठी पावले उचलण्यात येतील असेही शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा - टिनाच्या शेडात पाच मुली, माय आणि आजी, चार...
शाळा अतिरिक्त शुल्क आकारीत असल्याच्या पालकांच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या होत्या. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काही शाळेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने तपासणी पथकाने विविध मुद्यांवर शाळेकडून माहिती मागितली होती. मात्र, शाळेने परिपूर्ण माहिती सादर केली नाही. त्यामुळे महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क नियमन) कायदा २०११ उल्लंघन झाले असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेने शुल्क कायद्यातील तरतुदींनुसार शुल्क निर्धारण केलेले नाही. याशिवाय शाळेने वेतनपट, प्रवेश नोंदणी, शुल्क पावती, शुल्क संकलन नोंदणी, रोख पुस्तक, ग्रंथालय आणि वाचन कक्ष खाते, कर्मचारी हजेरीपुस्तक, मालमत्ता नोंदणी असे विविध दस्तावेज योग्य प्रकारे राखले नसल्याचे शिक्षण उपसंचालकांच्या आदेशांत नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.