देवेंद्र फडणवीस पुन्हा होणार मुख्यमंत्री? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

साधना सहकारी बॅंकेच्या नवनिर्मिती इमारतीच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. भय्याजी जोशी म्हणाले, लोकशाहीत सरकार येतात आणि जातात. मुख्यमंत्र्यांसोबतच विरोधीपक्षनेता हे पदही तेवढेच महत्त्वाचे असते. मात्र, सरकारकडे मोठी शक्ती असते. समाजाच्या हिताचे मोठमोठे निर्णय घेण्याची ताकद असते. याहीपेक्षा लोकशाहीत सर्वाधिक ताकदवर सर्वसामान्य माणूस असतो. तो जागृत असेल, तर लोकशाही अधिक सुदृढ होते. 

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यात फार काळ विरोधी पक्षनेता म्हणून राहण्याचा योग नाही, असे भाकित करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी ते लवकरच मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असे संकेत दिले. यावेळी त्यांनी लोकशाहीत मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते दोन्ही पद अल्पायुषी असतात याकडेही लक्ष वेधले. 

साधना सहकारी बॅंकेच्या नवनिर्मिती इमारतीच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. भय्याजी जोशी म्हणाले, लोकशाहीत सरकार येतात आणि जातात. मुख्यमंत्र्यांसोबतच विरोधीपक्षनेता हे पदही तेवढेच महत्त्वाचे असते. मात्र, सरकारकडे मोठी शक्ती असते. समाजाच्या हिताचे मोठमोठे निर्णय घेण्याची ताकद असते. याहीपेक्षा लोकशाहीत सर्वाधिक ताकदवर सर्वसामान्य माणूस असतो. तो जागृत असेल, तर लोकशाही अधिक सुदृढ होते.

Video : ठाकरे सरकारच्या मंत्र्यांमध्ये धुसफूस, तब्बल दहा राज्यमंत्र्यांनी केली कॅबिनेटमंत्र्यांची तक्रार

भय्याजी जोशी यांनी वर्तविले भाकित 
भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासूनच ते लवकरच कोसळणार, असे जाहीर वक्तव्य भाजपचे नेते करीत आहेत. याच आशेवर अनेक मंत्र्यांनी अद्याप मुंबईतील बंगलेसुद्धा रिकामे केलेले नाहीत. भाजपच्या नेत्यांना तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, आम्ही पाच वर्षे राहणार आहोत, असे सांगून महाआघाडीतर्फे प्रत्युत्तर दिले जात आहे.

वारिस पठाण यांना देवेंद्र फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...

सरकार स्थापन झाल्यापासून एनआरसीसी, सीएएए, कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी यावरून महाआघाडीत मतभेद दिसत आहेत. आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यात सीएए कायद्याला घाबरण्याची गरज नाही, असे पत्रकार परिषदेत सांगितले. यावरून महाआघाडीत पुन्हा मतभेद उफाळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadanvis may become chief minister again