ते दिवसा राहायचे मालक-नोकर अन् रात्री सोबत प्यायचे दारू, तरीही...

अजय धर्मपुरीवार 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शनिवारी (१ ऑगस्ट) सकाळी संजय बडवाईक ढाब्यावर गेले असता त्यांना प्रवीणचा मृतदेल दिसला. लागलीच त्यांनी याची माहिती हिंगणा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाढत पंचनामा सुरू केला. नोकर फरार झाल्याने शोधत एक पथक रवाना करण्यात आले. 

हिंगणा (जि. नागपूर) : सोबत दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून नोकराने ढाबा मालकाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून हत्या केली. ही घटना शुक्रवारच्या मध्यरात्री १२ वाजता हिंगणा जवळच आऊटर रिंग रोडवर असलेल्या तंदुरी धाब्यावर घडली. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हिंगणा पोलिसांनी काही तासातच आरोपी नोकराला नागपूरच्या रविनगर भागातून अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण नागोराव सातपुते (४०, रा. वागदरा, इसासनी, हिंगणा) यांनी संजय बडवाईक यांच्या शेतातील ढाबा चालविण्यासाठी भाड्याने घेतला होता. तिथे काही दिवसांपूर्वी निखिल विजय धाबर्डे (२९, रा. जोगेश्वरपुरी, तहसील कार्यालयसमोर, हिंगणा) याला स्वयंपाक व भांडीधुनी करायला ठेवले होते.

सविस्तर वाचा - आई-वडिलांची मेहनत सफल झाली, कौतुकही झाले, आनंदही झाला; मात्र, पुढे काय? वाचा संघर्ष…

शुक्रवारी नेहमीप्रमाणे सर्व सुरळीत होते. ढाब्यावर प्रवीणचा लहान भाऊ मनोज सातपुते देखील मदत करीत होता. दैनंदिन कामे आटोपल्यावर प्रवीणने लहान भाऊ मनोजला घरी जाण्यास सांगितले. रात्री ११:३० च्या सुमारास धाब्यावर प्रवाण आणि निखिल हे दोघेच होते. दोघांनी एकाच टेबलवर बसून दारू पिणे सुरू केले. 

दारू पितानाच त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यामुळे प्रवीणने निखिलला शिवीगाळ केली. रागाच्या भरात निखिलने तिथेच पडलेल्या लोखंडी दांड्याने प्रवीणच्या डोक्यावर वार केले. तो मरण पावला हे कळताच घटनास्थळावरून पळ काढला. 

शनिवारी (१ ऑगस्ट) सकाळी संजय बडवाईक ढाब्यावर गेले असता त्यांना प्रवीणचा मृतदेल दिसला. लागलीच त्यांनी याची माहिती हिंगणा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाढत पंचनामा सुरू केला. नोकर फरार झाल्याने शोधत एक पथक रवाना करण्यात आले.

विशेष बातमी  -  “सानिका तुझ्या शिक्षणाची जबाबदारी माझ्याकडे” थेट विधान भवनातून आला फोन आणि तिला बसला आश्चर्याचा धक्का..

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सारीन दुर्गे, पोलिस उपनिरीक्षक मनोज ओरके, मल्हारी डोईफोडे, एएसआय सुनील भांडेगावकर, दिलीप ठाकरे, नीलेश वासनकर, विक्रांत देशमुख यांनी अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली. 

रवीनगरातून आरोपीला अटक

मालकाचा खून केल्यानंतर नोकर घटनास्थळावरून फरार झाला. आरेपीच्या शोधात पोलिसांचे एक पथक पाठवण्यात आले. पोलिसांनी काही तासातच आरोपी नोकराला नागपूरच्या रविनगर भागातून वडिलांच्या घरून शनिवारी सकाळी ११ वाजता अटक केली.

क्लिक करा - ऑनलाईन व ऑफलाईन स्तरावर सुरू होणार शाळा, प्रायोगिक तत्वावर केवळ इयत्ता पाचवीपासून सुरुवात

नेहमी करायचा शिवीगाळ

ढाबा मालक प्रवीण हा नेहमीच नोकर निखिलला शिवीगाळ करीत असायचा. कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्याच्याशी वाद घालत राहायचा. सततच्या त्रासामुळे निखिल कंटाळला होता. यामुळेच मालकाची हत्या केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. 

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhaba owner killed by a employee in Nagpur