षडयंत्र! पैसे कमविण्यासाठी कोरोना रुग्णांचा वापर होत आहे का...वाचा सविस्तर

राजेश प्रायकर
Wednesday, 12 August 2020

खाजगी पॅथॉलॉजी लॅब मोकाट सुटल्याचे चित्र आहे. खाजगी रुग्णालयांसोबत संगनमताने गोरखधंदा सुरू असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

नागपूर : स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी एकाच तरुणीचे दोन वेगवेगळ्या कोरोना तपासणी अहवालाची बाब उघडकीस आणली. असाच प्रकार ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी उजेडात आणला. हंसापुरी खदान येथील एका ४० वर्षीय महिलेने सेंट्रल एव्हेन्यूवरील एका खाजगी लॅबमध्ये कविड तपासणी केली. या लॅबमधून महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल देण्यात आला.

सध्या ती काय करते? 'स्वदेश' फेम गायत्री जोशीची कहाणी, वाचा...

या महिलेने नंतर महापालिकेच्या भालदारपुरा आरोग्य केंद्रात पुन्हा कोरोना तपासणी केली. येथून महिलेचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे तिवारी म्हणाले. एवढेच आणखी एका घटनेत कन्नमवारनगरातील ७४ वर्षीय महिले दोन वेगवेगळ्या खाजगी लॅबमध्ये कोरोना तपासणी केली. दोन्ही लॅबने कोरोना तपासणीचे अहवाल वेगवेगळे दिले. या दोन्ही घटनांमुळे खाजगी पॅथॉलॉजी लॅब कुठल्या षडयंत्रातून काम तर करीत नाही ना? अशी शंका निर्माण होत असल्याचे दयाशंकर तिवारी यांनी नमुद केले.

वा रे पठ्ठे...शाळेलाच पाठवले ऑनलाइन क्लासेसचे बिल

या वाढत्या घटनांवर नियंत्रणासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडेही उपाययोजना नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनातील अधिकारी वातानुकूलित कक्षात बैठकांत व्यस्त आहेत. विशेष म्हणजे झलके यांनी आयुक्तांना याप्रकाराबाबत माहिती देण्यासाठी काल, सोमवारी फोन केला होता. परंतु त्यांनी फोन उचलला नसल्याचे झलके म्हणाले. पालिका प्रशासनाचे पॅथॉलॉजीवर नियंत्रण नसल्याने अहवालाचा भोंगळ कारभार आणखी वाढण्याची शक्यता आहे. खाजगी लॅब व खाजगी रुग्णालयांनी तर आता पैसे कमविण्यासाठी कोरोना रुग्णांनाचा वापर सुरू केल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे. अनेक रुग्ण सकाळी खाजगी लॅबमध्ये चाचणी केल्यास पॉझिटिव्ह, दुपारी शासकीय रुग्णालयात निगेटिव्ह येत असून सायंकाळी घरी परत येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

एकाच व्यक्तीकडून खाजगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये तसेच महापालिकेच्या चाचणी केंद्रात कोविड चाचणी केल्यानंतर वेगवेगळे अहवाल दिल्या जात आहेत. संपूर्ण शहरात गेल्या काही दिवसांपासून हा गोंधळ सुरू असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शहरातील काही खाजगी पॅथॉलॉजी लॅबमध्येही एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे अहवाल आले आहेत. दिवसेंदिवस कोरोना अहवालाचा भोंगळ कारभार सुरू असून पालिका प्रशासन वातानुकूलित कक्षात वांझोट्या बैठकीत रंगले असल्याने खाजगी पॅथॉलॉजी लॅब मोकाट सुटल्याचे चित्र आहे. खाजगी रुग्णालयांसोबत संगनमताने गोरखधंदा सुरू असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

अनेक रुग्ण सकाळी खाजगी लॅबमध्ये टेस्ट केल्यास पॉझिटिव्ह, शासकीय रुग्णालयात निगेटिव्ह असल्यामुळे सायंकाळी घरी परत येत आहे. पालिकेचे डॉक्टर कोविड रुग्णांना घरी राहण्याचा सल्ला देतात, मात्र येऊनही पाहत नाही. त्यामुळे मनपा कोरोनाच्या प्रसारास हातभार लावत आहे की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.  
- कृष्णा खोपडे, आमदार.  

खाजगी पॅथॉलॉजीचे अहवाल एखाद्या नियोजित षडयंत्राचा तर भाग नाही ना, अशीही शंका आहे. कोविड-१९ चे सर्वाधिकारी असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. असे शंका निर्माण करणारे अहवाल टाळण्यासाठी त्यांनी पाऊले उचलावी. नियमानुसार चाचणी होते की नाही याबाबत चौकशी करावी. 
- दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ नगरसेवक.  

(संपादन : प्रशांत राॅय)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Different reports from the same person after covid test