निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्याची गरज - डॉ. संजीव कुमार

divisional commissioner sanjiv kumar on graduation constituency election
divisional commissioner sanjiv kumar on graduation constituency election

नागपूर : पदवीधर निवडणुकीसाठी  बॅलेट पेपरचा उपयोग होत असून उमेदवाराला पसंतीक्रम द्यावा लागतो. यासह अनेक सूक्ष्म बाबी असतात. यानुषंगाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले.

आयुक्त कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे त्यांनी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून निवडणुकीच्या कामाचा आढावा  घेतला. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपायुक्त मिलींद साळवे, आशा पठाण, रमेश आडे, अतिरिक्तर जिल्हाधिकारी निशीकांत सुके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी उपस्थित होते. अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक बाबीचे प्रशिक्षण द्यावे. त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात यावे. वाहनासाठी परवानगी ही जिल्हापातळीवर जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्फत  देण्यात येईल. माध्यम संनियत्रण समिती देखील जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली राहील. तसेच निवडणूक प्रक्रियेतील अहवाल हे वेळेवर विभागीय आयुक्त कार्यालयात पाठविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्यात. प्रचार रॅलीबाबत आयोगाकडून मार्गदर्शन घेण्यात येत असून मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिग या   त्रिसूत्रीचा अवलंब करून निवडणूक घेण्यात येत असल्याने मतदान केंद्रावर या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

आठ इच्छुकांनी घेतले अर्ज -
गुरुवारी पहिल्या दिवशी २४ इच्छुकांनी ३३ अर्ज घेतले, तर शुक्रवारी ८ इच्छुकांनी अर्ज घेतले.  १३ नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार असून १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १ डिसेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान करण्याचा कालावधी असणार आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने सोमवारनंतरही प्रमुख उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com