‘त्या’ गुन्हेगाराचे फाडावे लागणार पोट; पोलिस कस्टडीत असताना खाल्ले होते खिळे

अनिल कांबळे
Monday, 25 January 2021

त्याला विचारणा केली असता खिळे खाल्ल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. महिला पोलिसाने लगेच ठाणेदार पराग पोटे यांना माहिती दिली. त्यांनी आरोपीला मेयोत दाखल केले.

नागपूर : लकडगंज पोलिसांच्या ताब्यातील कुख्यात गुन्हेगाराने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने शौचालयात दरवाज्याचे खिळे खाल्ले. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी त्याला तातडीने मेयोत दाखल केले. ही घटना शनिवारी दुपारी घडली. एक्स-रे काढल्यानंतर डॉक्टरांनी पोटाचे ऑपरेशन करून खिळे काढण्याचा निर्णय घेतला. नरेश अंकालू महिलांगे (२५, रा. पुंजारामवाडी, नागपूर) असे गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश महिलांगे हा कुख्यात गुन्हेगार आहे. तो बराच काळ कारागृहात होता. लकडगंज परिसरात घरफोडी केल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सहकारी ज्ञानेश्‍वर नागपुरे आणि हनुमान पाटील यांनाही पोलिसांनी अटक केली. शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास गार्ड ड्युटीवर असलेली महिला पोलिस वैशाली आरोपींनी जेवणाबाबत विचारणा केली. त्यावेळी नरेशने शौचास जायचे असल्याचे सांगितले.

अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

त्याच्या हाताला दोरी बांधून पोलिसांनी शौचालयात नेले. बराच वेळ तो शौचालयात होता. त्याला बाहेर काढण्यात आले. त्याच्या तोंडात काहीतरी होते. पोलिसांच्या लक्षात येण्यापूर्वी त्याने ते लगेच गिळले. त्याला विचारणा केली असता खिळे खाल्ल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. महिला पोलिसाने लगेच ठाणेदार पराग पोटे यांना माहिती दिली. त्यांनी आरोपीला मेयोत दाखल केले.

ऑपरेशन करून काढणार खिळे

लकडगंज पोलिसांनी आरोपी नरेशला ताबडतोब मेयोत दाखल केले. एक्स-रे काढल्यानंतर त्याने खिळे खाल्ल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी त्याचे ऑपरेशन करून पोटातून खिळे काढण्याचा निर्णय घेतला. सोमवारी त्याच्यावर ऑपरेशन करण्यात येणार आहे. या घटनेमुळे पोलिस दहशतीत आले आहे.

जाणून घ्या - माणुसकीला कळीमा! बाळाचा जन्म अन् पतीचा मृत्यू; बाळ अपशकुनी असल्याचे समजून केले भयानक कृत्य

मेडिकलमधून काढला होता पळ

एप्रील महिन्यात कोवीडमुळे अनेक जण परराज्यात किंवा परजिल्ह्यात अडकले होते. त्यामुळे बंद असलेल्या घरावर डल्ला मारण्याचा सपाटा नरेश आणि टीमने सुरू केला होता. अशाच एका घरफोडीच्या गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक केली होती. पीसीआर संपल्यानंतर त्याची न्यायालयाने करागृहात रवानगी केली होती. त्याला हुडकेश्‍वर पोलिसांनी एप्रील महिण्यात ताब्यात घेतले होते. तो कोरोना पॉजीटीव्ह आल्यामुळे त्याला मेडिकलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याने पहाटेच्या सुमारात पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला होता. सहा महिने गायब राहिल्यानंतर त्याला अकोल्यातून अटक केली होती. नरेशमुळे आतापर्यंत तीन पोलिसांवर निलंबित होण्याची वेळ आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The doctor will remove the nails by operating on the accused