बापरे! शाळेत आला नी मारली त्याने दडी, सगळयांचीच वळली बोबडी, मग काय,....

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

शाळेला आता सुटया आहेत. परंतू त्या पाहुण्याने विद्यार्थी नसताना अचानक "एंट्री' मारली. शाळेत असलेल्या सर्व कर्मचा-यांच्या अंगावर त्याला पाहून काटाच उभा राहिला. कर्मचा-यांनी उसणे अवसान आणले व नंतर घडलेल्या घटनेला मुकाटयाने सामोरे गेले.

रामटेक (जि.नागपूर): शनिवारी रात्री साडेदहाची वेळ. वाइल्ड चॅलेंजर्स ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष राहुल कोठेकर यांनी त्यांना वाहिटोला येथून प्राथमिक शाळेतून फोन आला. लगेच त्यांनी सागर धावडे यास घटनास्थळी पाठवले. सागर धावडे यांनी टॉर्चच्या प्रकाशात पाहिले असता, तो चक्क आवारात ठाण मांडून बसल्याचे आढळले. लगेच शिताफीने त्यांनी "तो' पकडला.

हेही वाचा : मॉन्सूनची वाटचाल योग्य दिशेने, या तारखेला होणार विदर्भात दाखल

...अन्‌ उपस्थितांनी सोडला अखेर श्‍वास
वाहीटोला येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागे राहणारे नरसिंग (नेहाल) गुड्डी यांना शाळेच्या पटांगणात 8 फूट लांब अजगर दिसून आला. त्यांनी त्वरित वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष राहुल कोठेकर यांना "कॉल' करून मोठा साप असल्याची माहिती दिली. त्यांनी सापाकडे सुरक्षित अंतर ठेवून लक्ष देण्यास सांगितले. लगेच राहुल कोठेकर यांनी सर्पमित्र सागर धावडे यांना वाहिटोला येथे पाठवले. सागर धावडे वेळ न गमावता घटनास्थळी पोहोचले. त्या अजगराला सुरक्षितरीत्या पकडून रामटेकचे राउंड ऑफिसर श्री. अगडे व पंकज कारामोरे यांच्यासोबत अजगरला जंगलात सुरक्षितस्थळी सोडण्यात आले.

आणखी वाचा : नागपूरच्या "लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिका-यांची शिकार

वाइल्ड चॅलेंजर्स ऑर्गनायझेशनच्या कामाची स्तुती
रामटेक वनविभागाचे एसीपी संदीप गिरी, आरएफओ रवींद्र शेंडे व वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे
अध्यक्ष राहुल कोठेकर, सचिव अजय मेहरकुळे यांच्या माहितीनुसार लॉकडाउनमुळे शाळा, धार्मिकस्थळे, वाहने व वाचनालय आणि गर्दीची ठिकाणे ही तीन महिन्यांपासून बंद आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर यात साप किंवा कोणतेही सरपटणारे जीव लपून बसले असू शकतात. करिता आपण सर्वांनी आधी त्यांची पूर्णपणे तपासणी करून स्वच्छता करून घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या अपघाताला बळी पडणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन केले.
सर्व अधिकारी व गावकऱ्यांनी वाइल्ड चॅलेंजर्स ऑर्गनायझेशनच्या कामाची स्तुती करून अजगराचा जीव वाचविल्याबद्दल वाइल्ड चॅलेंजर्स ऑर्गनायझेशनचे (सर्प मित्र व प्राणिमित्र संघटना रामटेक) आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The dragon was kicking in elementary school