विशाखापट्टनम एक्स्प्रेसमधून ९० किलो गांजा जप्त; धावत्या रेल्वेत आरपीएफची कारवाई

Drugs caught by RPF in Vishakhapattanam express in Nagpur
Drugs caught by RPF in Vishakhapattanam express in Nagpur

नागपूर ः रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने शुक्रवारी विशाखापट्टनम- नवी दिल्ली एक्स्प्रेसमध्ये कारवाई करीत गांजा तस्करांच्या आंतरराज्यीय टोळीतील सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून ९० किलो गांजा जप्त केला.

राजेंद्र संतोष मंडल मुरली (२१) रा. उडिसा, संजीव कुमार सिंह (२६) रा. बिहार, हरपाल सिंह (४४) रा. उत्तरप्रदेश, कांचन कुमार राम (२०) बिहार, करीम मौहम्मद कुरैशी (२२) रा. गोरखपूर उत्तरप्रदेश आणि सद्दाम अलाउद्दीन हुसैन (२१) रा. गोरखपूर उत्तरप्रदेश अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत.

आरपीएफचे चंद्रपूर येथील पथक विशाखापटनम - नवी दिल्ली एक्स्प्रेमध्ये गस्त घालत नागपूरच्या दिशेने निघाले. एस -६ क्रमांकाच्या डब्यातून उग्र दर्प आल्याने जवानांना शंका आली. लागलीच याबाबत कंट्रोल रुमला कळविण्यात आले. ही गाडी नागपूर स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले. गाडी दाखल होताच वेगवेगळ्या डब्यांमध्ये झाडाझडती सुरू करण्यात आली. 

एस ६ क्रमाकाच्या डब्यातून दोन तर ए-१ क्रमाकाच्या डब्यातून चौघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीतच त्यांनी सोबत गांडा असल्याची कबुली दिली.त्यांच्याकडून ८ लाथ ९१ हजार रुपये किमतीचा ८९.१९४ किलो गांजा जप्त करण्यात आला. आरपीएफच्या पथकाने गेल्या २० दिवसांमध्ये सुमारे १६ लाख रुपये किमतीचा एकूण १६१ किलो गांजा जप्त करीत १२ तस्करांना अटक केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com