'त्या' आठ विदेशींनी लपवली माहिती, म्हणून घ्यावा लागला हा निर्णय...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

तीन महिला दुसऱ्या ठिकाणी मुक्कामी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच तेथे पोहोचून महिलांना ताब्यात घेतले. हे सर्व नागरिक यानगोन सिटी, म्यानमार-बर्मा येथील असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर लॉकडाउन उल्लंघन, व्हॉयलेटिंग फॉरेनर्स ऍक्‍टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

नागपूर : दिल्लीतील तबलिगी जमातमध्ये सहभागी होऊन नागपुरातील एका धार्मिक स्थळामध्ये विनापरवानगी मुक्‍काम करणाऱ्या आठ विदेशी नागरिकांवर तहसील पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्या आठही जणांना आमदार निवासातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून, यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संकट पाहता सध्या देशात लॉकाडाउन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकज येथे शेकडो लोकांनी एकत्र येऊन लॉकडाउनचे उल्लंघन करून कोरोनाला आमंत्रण दिले होते. मरकज येथे देशभरातील नागरिकांसह विदेशांतील लोकही सहभागी झाले होते. दिल्लीतून अनेक जण आपापल्या राज्यात परतले, तर विदेशी नागरिक भारतातील विविध शहरांतील धार्मिक स्थळी मुक्‍कामी होते. अशाप्रकारे नागपुरात 56 मरकज जमाती आढळले होते. त्यांना आमदार निवासात क्‍वारंटाईन करण्यात आले होते. 

यांच्यासह विदेशातील अन्य नागरिक नागपुरातील असल्याची माहिती तहसील पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक जयेश भांडारकर आणि उपनिरीक्षक स्वप्नील वाघ पथकासह सोमवारी शहरातील एका धार्मिक स्थळी पोहोचले. त्यांनी तेथे विदेशी नागरिकांबाबत चौकशी केली. तेथे चार विदेशी नागरिक असल्याची माहिती त्यांना मिळाली. पीएसआय वाघ यांनी तेथून चौघांना ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा - घरावर आकाशातून अचानक येऊन पडली ती वस्तू आणि...

तीन महिला दुसऱ्या ठिकाणी मुक्कामी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच तेथे पोहोचून महिलांना ताब्यात घेतले. हे सर्व नागरिक यानगोन सिटी, म्यानमार-बर्मा येथील असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर लॉकडाउन उल्लंघन, व्हॉयलेटिंग फॉरेनर्स ऍक्‍टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सात मार्चला आले होतो नागपुरात

आठही विदेशी नागरिक सात मार्चला नागपुरात आले होते. सुरुवातीला गिट्टीखदान परिसरातील एका धार्मिक स्थळी त्यांनी वास्तव्य केले. त्यानंतर त्यांनी गिट्टीखदानमधून तहसील परिसरात मुक्‍काम ठोकला. तेव्हापासून ते आठही नागरिक तहसील परिसरातच होते. पोलिस आयुक्‍तांनी आवाहन केल्यानंतरही त्यांनी पोलिसांनी माहिती दिली नाही, हे विशेष... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight foreigners have been lodged a crime in Nagpur