
सर्वात कमी ९९ चाचण्या नीरी प्रयोगशाळेत झाल्या असून अवघे १५ जण बाधित आढळले. यामुळे आतापर्यंत शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ८८ हजार ३२९ तर ग्रामीण २२ हजार ४६ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे पुढे आले.
नागपूर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा नियंत्रणात येत असतानाच मृत्यूमध्ये अचानक वाढ झाली. सोमवारी (ता.३०) शहरी व ग्रामीण भागातील विविध रुग्णालयांत मागील २४ तासांमध्ये १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामुळे आरोग्य विभागात अचानक खळबळ उडाली आहे.
मागील महिनाभरातील सर्वाधिक मृत्यूची नोंद आज झाली. तर २०० बाधितांची नव्याने भर पडली. यामुळे आतापर्यांत कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ११ हजार ७६५ वर पोहचला आहे. तर मृत्यूच आकडा ३ हजार ६७२ झाला आहे. सोमवारी दगावलेल्या एकूण १८ बाधितांमध्ये ९ रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत. यात शहरातील ६ तर ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे. तर ९ जण जिल्हाबाहेरून रेफर झालेले आहेत.
जाणून घ्या - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला
शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ५३४, ग्रामीण ६३० झाली आहे. तर जिल्हाबाहेरून रेफर करण्यात आलेल्या ५०८ रुग्णांचा नागपूरच्या मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. नागपुरात सोमवारी ४ हजार ५०४ चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत सुमारे ७ लाख ८४ हजार २६७ चाचण्या झाल्या आहेत.
शहरात झालेल्या ३ हजार ८५३ चाचण्यांमध्ये २२० जण तर ग्रामीण नागपुरातील ६५१ चाचण्यांमध्ये ५९जणांना कोरोना झाल्याचा अहवाल प्रयोगशाळांमधून आला. विशेष असे की, सर्वाधिक चाचण्या या खासगी प्रयोगशाळेतच होत आहेत. २ हजार ११९ चाचण्या खासगीत झाल्या आहेत.
यातील४३ जण बाधित आढळून आले. सर्वात कमी ९९ चाचण्या नीरी प्रयोगशाळेत झाल्या असून अवघे १५ जण बाधित आढळले. यामुळे आतापर्यंत शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ८८ हजार ३२९ तर ग्रामीण २२ हजार ४६ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे पुढे आले.
जिल्हाबाहेरील ६९० आतापर्यंत रेफर करण्यात आले. शहरात सोमवारी ४ हजार २७७ तर ग्रामीणला ६४९ असे एकूण ४ हजार ९२६ सक्रिय उपचाराधिन करोना बाधित रुग्ण असल्याचे पुढे आले. त्यातील १ हजार २६ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. तर ३ हजार ६१२ रुग्णांवर गृह विलगिकरणात उपचार सुरू आहेत.
सविस्तर वाचा - शेतजमिनीला मोल येताच नात्यात कटुता, एक स्वाक्षरी लाखोंची
सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. २८८ कोरोनाबाधितांचा आकडा आहे. तर कोरोनामुक्तांचा आकडा २९५ आहे. यात शहरातील २७५, ग्रामीणचे २० व्यक्तींचा कोरोनामुक्तांमध्ये समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत शहरातील कोरोनामुक्तांची संख्या ८१ हजार ५१८, ग्रामीण २१ हजार ६४९ अशी एकूण १ लाख ३ हजार १६७ वर पोहचली आहे.
संपादन - नीलेश डाखोरे