नागपूर मनपाची 'आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

आस्थापना खर्च 35 टक्‍यांपेक्षा कमी करण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहे. मात्र, महापालिकेचा आस्थापना खर्च 50 टक्‍क्‍यांवर आहे. परिणामी मंजूर 11961 पदांपैकी अद्यापही 4 हजार 4 पदे रिक्त आहेत. मनपात गेल्या तीन वर्षातील पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. 869 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. 850 आश्वासित पदोन्नतीही निकाली काढण्यात आली. असे एकूण 1719 पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढण्यात आले.

नागपूर : अवास्तव खर्च कपातीला बगल दिल्याने महापालिकेचा आस्थापना खर्च 50 टक्‍क्‍यांवर पोहोचला असून चार हजारावर रिक्‍त पदे भरण्यात अडथळा निर्माण झाला आहे. एकीकडे उत्पन्न कमी असताना अवास्तव खर्चालाही महत्त्व देण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगही रखडला आहे.

आस्थापना खर्च 35 टक्‍यांपेक्षा कमी करण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहे. मात्र, महापालिकेचा आस्थापना खर्च 50 टक्‍क्‍यांवर आहे. परिणामी मंजूर 11961 पदांपैकी अद्यापही 4 हजार 4 पदे रिक्त आहेत. मनपात गेल्या तीन वर्षातील पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. 869 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. 850 आश्वासित पदोन्नतीही निकाली काढण्यात आली. असे एकूण 1719 पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढण्यात आले. 31 डिसेंबर, 2017 च्या सुप्रीम कोर्टाने आरक्षण प्रवर्गातील पदोन्नती मुक्त संवर्गातून करण्याचा निर्णय दिल्यानंतर 311 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहेत.

हेही वाचा - अहो आश्‍चर्यम्‌ नवेगावमध्ये आढळले अल्बिनो सांबर
 

मनपात 2004 मध्ये रिक्तपदे भरण्यात आली. तर, 2012 मध्ये पदभरती करण्यात आली. त्यानंतर आतापर्यत भरतीप्रक्रिया झाली नाही. त्यामुळे रिक्त पदे मोठया संख्येत वाढत आहेत. उलटपक्षी, मनपातून सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या प्रत्येक महिन्यात वाढत आहे. त्यामुळे कंत्राटी नियुक्ती देण्यात आली. आतापर्यंत अतितात्काळ स्वरूपाचा 54 पदे भरण्यात आली आहे. सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी पदभरती केलेल्यांची संख्या तीनशेच्या आसपास आहे. सिमेंट रस्त्यांसाठी 80 तर, अग्निशमन विभागात 13 जणांची भरती करण्यात आली. उपद्रव शोध पथकातही कंत्राटी भरण्यात आली आहे. 2017 ते 2019 या दोन वर्षातील कालावधीत विभागीय पदोन्नती समितीने सर्व पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढली आहेत. 2017 ते 2019 या दोन वर्षात वर्ग1, वर्ग2 ,वर्ग 3 व वर्ग 4 अशी एकू 1751 प्रकरणे समितीसमोर आली. यातील 869 जणांना पदोन्नती देण्यात आली. तर, 12 व 24 वर्षाची आश्वासीत पदोन्नतीची एकूण 850 अशी एकूण 1791 पदोन्नतीची प्रकरणे समितीने निकाली काढली.

क्लिक करा - तमाशासम्राज्ञी विठाबाईंचे स्मारक अजुनही कागदावरच
 

ऑरेंजसिटी कल्चरल फाऊंडेशन अनुदान
2019-20 या आर्थिक वर्षात मनपा क्षेत्रात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनासाठी 20 लाखांचे अनुदान देण्यास मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. ही जबाबदारी पुन्हा एकदा डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्या ऑरेंजसिटी कल्चरल फाऊंडेशनला देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षापासून याच फाऊंडेशनकडेच ही जबाबदारी होती. यासाठी मनपाकडे 20 लाखाचीच तरतूद आहे. यावर्षी ऑरेंज सिटी फाऊंडेशनसोबत प्रियांशी माने यांच्या जॉलीवर्ल्ड एंटरटेनमेंट ऍण्ड प्रॉडक्‍शन प्रा.लिमिटेडचाही प्रस्ताव होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: excess expenses of nagpur municipal corporation