रानडुकरांची शिकार करण्यास केला हा प्रयोग...सहाजणांना अटक.

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जून 2020

वन्यप्राण्यांची शिकार करून उदरनिर्वाह करण्यासोबतच पैसे कमविण्यासाठी भंडारा जिल्हयातील शिका-यांनी फंडा शोधून काढला. पोलिसांनी सापळा रचून अखेर त्या सहा शिका-यांना ताब्यात घेतले. परंतू त्यांची ही शक्‍कल अफलातून असल्याचे यानिमित्त दिसून आले.

रामटेक (जि.नागपूर): 7 जून रोजी आसोली-बिटअंतर्गत रानडुकराची शिकार करण्यात आल्याची व त्याचे मांसाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, रामटेकचे सहायक वनसंरक्षक संदीप गिरी आणि वनपरिक्षेत्राधिकारी रवींद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहायक डी. आर. अगडे, वनरक्षक स्वरूप केरवार, के. जी. नागपुरे, पी. जी. कारामोरे, व्ही. वाय. उगले यांनी सापळा रचला.

आनंदाची बातमी: भूमीपुत्रांच्या रोजगाराचा पुनश्‍च हरिओम

कुत्र्यांच्या साहाय्याने रानडुकराची शिकार
भांडेवाडी ते शिवाडौली रस्त्यावर दुचाकी अडवून दुचाकीस्वार सुनील रतिराम गोणे (रा. अरोली) याची झडती घेतली असता, दोन पिशव्यांमधून अंदाजे 30 किलो रानडुकराचे मटण आढळून आले. अधिक चौकशी केली असता, त्याने हे मटण सुभाष भाऊराव महालगावे (रा. हिवरा, ता. मोहाडी, जि. भंडारा) यांच्याकडून 2000 रुपयांत घेतले असून, विक्री करण्यासाठी अरोलीला आणले, अशी माहिती दिली. लगेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हिवरा येथे जाऊन आरोपी सुभाष महालगावे यास ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत गावातील कुत्र्यांच्या साहाय्याने अडेगाव शिवारात रानडुकराची शिकार करण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड व सुरीने रानडुकराचे तुकडे केले.

हेही वाचा : सावधान... सापांसोबत स्टंट केल्यास गुन्हा

कुऱ्हाड व सुरी जप्त
या शिकारीत सुशील मुलचंद महालगावे (27), मोरेश्वर गणपत मेश्राम (50), बळीराम शिवा भोयर (30), रोशन सतिराम चौधरी (20, सर्व रा. हिवरा, ता. मोहाडी, जि. भंडारा) हे सहभागी असल्याची माहिती दिली. घटनास्थळ गाठून लाकडी ठोकळा तर आरोपीच्या घरातून कुऱ्हाड व सुरी जप्त करण्यात आली. सर्व सहा आरोपींविरुद्ध वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर सोमवारी (ता. आठ) आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास प्रभूनाथ शुक्‍ल, उपवनसंरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी रवींद्र शेंडे व सहकारी करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This experiment was done to hunt cows ... Six people were arrested